आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Cold Wave Continues In North India, Mild Snowfall In Lahaul

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

उणे १५ तापमान, तरीही शाळेत १०० टक्के हजेरी

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
लाहोल - थंडी वाढली की शाळांना सुटी मिळते. मात्र हिमाचलातील लाहाेल-स्पीतीची गाेष्टच न्यारी. सध्या येथे तुफान बर्फवृष्टी होत आहे. तापमान उणे १५ अंश आहे. मात्र शाळा नेहमीप्रमाणे सुरू आहेत. विद्यार्थी रोज ४-५ किमी पायपीट करून शाळेत जातात. या बर्फात रोज त्यांचा रस्ता हरवतो. मग नवा रस्ता शोधलाही जातो.

हे छायाचित्र आहे लाहोल- स्पीती पायथ्याच्या केलांग गावाचे. येथे तीन ते चार फुटांपर्यंत बर्फ साचला आहे. तरीही जिल्ह्यातील १७५ शाळांत हजेरीचे प्रमाण १००% आहे. या भागातील साक्षरतेचे प्रमाण ८५.८ % आहे. ते भारताच्या सरासरी ७४ %साक्षरतेपेक्षा १२% अधिक आहे. या भागाचा ५ महिने जगाशी संपर्क तुटलेला असतो.
छाया : अनिल सहगल
इनपुट : गौरीशंकर