आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

काश्मीर खोर्‍यात पारा -१५.८ अंशांवर

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
श्रीनगर- काही दिवस विश्रांतीनंतर काश्मीर खोर्‍यात थंडीने पुन्हा जोर धरला आहे. कारगिलमध्ये यंदाचे सर्वात नीचांकी तापमान नोंदवले गेले असून येथील पारा उणे १५.८ वर घसरला आहे.

जम्मू-काश्मीरची राजधानी श्रीनगरमध्ये तापमान उणे ४.८ अंश एवढे नोंदवले गेले. बुधवारी रात्री येथील तापमान उणे अंशांवर होते. अमरनाथ यात्रेतील महत्त्वाचा टप्पा असलेल्या पहलगाम येथील तापमान उणे ७.२ अंशांवर पोहोचले. गुलमार्ग येथे बहुतांश पर्यटक नवे वर्ष साजरे करण्यासाठी येतात. येथील तापमान उणे ३.४ अंश एवढे नोंदवले गेले. हवामान विभागाच्या अंदाजानुसार, जानेवारीनंतर पश्चिमी वार्‍यांमुळे वातावरणात बदल जाणवेल.

श्रीनगर - तापमानाचा पारा खाली गेल्यामुळे अनेक भागांत बर्फ साचला. घरासमोर असा डोंगर तयार झाल्याचे पाहून मुलांना त्याचे कुतूहल वाटले नसते तरच नवल.