आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हिमवृष्टीमुळे थंडी-धुक्याचे प्रमाण वाढले; रेल्वे, विमान वाहतुकीवरही परिणाम

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
हिमाचल प्रदेशामध्ये झालेली हिमवृष्टी - Divya Marathi
हिमाचल प्रदेशामध्ये झालेली हिमवृष्टी
नवी दिल्ली/धर्मशाला/श्रीनगर - जम्मू-कश्मीर आणि हिमाचल प्रदेशात सध्या बर्फवृष्टी सुरू आहे. त्यामुळे देशातील मैदानी भागांमध्येही दोन दिवसांपासून थंडीमध्ये वाढ झाली आहे. रविवारी उत्तर भारताच्या अनेक भागांमध्ये दाट धुके पाहायला मिळाले. धुक्यामुळे राजधानी दिल्लीमध्ये रेल्वे आणि विमान वाहतुकीवर परिणाम झाल्याचेही पाहायला मिळाले.

दिल्लीतील सर्वात थंड दिवस
- हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार रविवारी हवामान विभागाने सर्वात थंड दिवसाची नोंद केली. दिल्लीमध्ये तापमान सरासरी तापमानाच्या तुलनेत 15.7 अंशांनी घटलेले पाहायला मिळाले. सर्वात कमी तापमान 6.8 अंश एवढे राहिले.
- दाट धुक्यामुळे दृष्यमानता शून्य ते 50 मीटर पर्यंतच होती. IGI विमानतळावरील विमान वाहतुकीवर त्याचा परिणाम पाहायला मिळाला.
- 30 हून अधिक उड्डाणांवर त्याचा परिणाम पाहायला मिलाल्याचे समोर आले. तसेच पाच विमानांचे मार्ग बदलण्यात आले. त्यामुळे शेकडो प्रवाशी अडकले आहेत.
- हवामान विभागाच्या मते, दिल्लीमध्ये आगामी चार दिवस धुक्याची स्थिती अशीच राहण्याची शक्यता आहे.

थंडीचा परिणाम आणखी कुठे ?
- युपी : उत्तर भारतातील अनेक भागांमध्ये थंडीचा जास्त परिणाम पाहायला मिळू शकतो. विशेषतः उत्तर प्रदेशात हुडहुडी भरली आहे.
- गुजरात : हवामान िवभागाने आगामी 24 तासांत थंडी राहणार असल्याची शक्यता व्यक्त केली आहे.
- कच्छच्या नलियामध्ये पारा 7 अंशावर आला आहे. अहमदाबादेत किमान तापमान 8.8 अंश नोंदवण्यात आले.

कुठे-कुठे झाली बर्फवृष्टी
- जम्मू-काश्मीर : वैष्णो देवीच्या डोंगरांवर या मोसमातील पहिली बर्फवृष्टी झाली. त्रिकुटाच्या डोंगरांमध्येही बर्फवृष्टी झाली. त्यामुळे तापमान बरेच खाली आले.
- हिमाचल प्रदेश : धर्मशालामध्ये शनिवारी रात्री बर्फवृष्टी झाली. कुफरी, नरकंडा, मनालीमध्येही गेल्या दोन दिवसांपासून बर्फवृष्टी सुरू आहे.
- पश्चिम विक्षोभ (वेस्टर्न डिस्टबेशन) मुळे जम्मू-काश्मीरमध्ये बर्फवृष्टी होत आहे. तसेच उत्तरेकडील वाऱ्यांमुळे मैदानी परिसरांमध्येही थंडी वाढली आहे.

पुढील स्लाइड्सवर पाहा, PHOTOS
बातम्या आणखी आहेत...