आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हिमवृष्टीमुळे काश्मिरात दोन दिवस दिसणार नाही सूर्य, तापमानात मोठी घट

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
श्रीनगर- जम्मू आणि काश्मिरसह हिमाचल प्रदेशमध्ये रविवारी जोरदार हिमवृष्टी झाल्याने तापमानात मोठी घट झाली आहे. येत्या काही दिवसांमध्ये तापमानात आणखी घट होण्याची शक्यता असून पुन्हा हिमवृष्टी होण्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तविला आहे. दरम्यान, जम्मू आणि काश्मिरमध्ये जोरदार हिमवृष्टी झाल्याने उत्तर भारतातील तापमानही सरासरीपेक्षा खाली आले आहे.
काश्मिरमधील गुलमर्ग, पहलगाम, सोनमर्ग, अमरनाथ गुफा, किश्तवाड आणि डोडा जिल्ह्यातील पर्वतरांगांवर बर्फाची चादर पसरली आहे. हिमाचल प्रदेशातील रोहतांग, राहनीनाला आणि सोलंग येथे जवळपास तीन फुट हिमवृष्टी झाली आहे. सिमल्यात पाच इंच बर्फ पडल्याची नोंद आहे.
जम्मू आणि काश्मिरमधील हिमवृष्टीची छायाचित्रे बघा पुढील स्लाईडवर