आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

उत्तरेकडील राज्यांत थंडीची लाट; जनजीवन विस्कळीत; आदमपूरमध्ये 5 अंश सेल्सियस तापमान

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

चंदिगड- देशाच्या उत्तरेकडील राज्यांत थंडीचा कडाका वाढला आहे. पंजाबमधील आदमपूरमध्ये सर्वात नीचांकी तापमानाची नोंद झाली आहे. हरियाणा, जम्मू-काश्मीरमध्ये,  राजस्थान आणि उत्तर प्रदेशात थंडीमुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. 

 
उत्तरेकडील राज्यांत आता भल्या पहाटेपासूनच शेकोट्या पेटू लागल्या आहेत. थंडीचा जोर चांगलाच वाढला आहे. पंजाब व हरियाणाची संयुक्त राजधानी असलेल्या चंदिगडमध्ये किमान ९ अंश सेल्सियस तापमानाची नोंद झाली आहे. आदमपूरमध्ये ५ अंश सेल्सियस तापमान होते.

 

पंजाबच्या अमृतसरमध्ये ६.८ अंश सेल्सियस, लुधियाना-९.२ अंश सेल्सियस, पतियाळा १०.९ अंश सेल्सियस तापमान नोंदवण्यात आले.  हरियाणातील अंबालामध्ये किमान १०.४, हिसार-६.८, कर्नाल, राेहतक, नारनौलमध्ये किमान अनुक्रमे ६.५ व ७.४ अंश सेल्सियस एवढे तापमान नोंदवण्यात आले. जम्मू-काश्मिरात शुक्रवारी विक्रमी थंडी नोंदवण्यात आली होती. त्यातही लडाख प्रांतात थंडी वाढली होती. शनिवारी मात्र तुलनेने उष्णतेत वाढ झाली होती. रात्रीच्या तापमानातही जम्मूत वाढ झाल्याचे आढळून आले आहे. गुलमर्ग आणि पहलगाममध्ये तापमान नीचांकीवर पोहोचले होते. काश्मीरच्या उत्तरेकडील गुलमर्गमध्ये उणे २.४ अंश तापमानाची नोंद झाली आहे. लखनऊ, जयपूरमध्ये या महत्त्वाच्या शहरातील तापमान सरासरी १० अंश सेल्सियस नोंदवण्यात आले. 


लाट मध्य, पूर्वेच्या दिशेने  
गत चोवीस तासांत थंडीच्या लाटेने देशाच्या मध्य व पूर्वेच्या दिशेने वाटचाल सुरू केली आहे. त्यामुळे मध्य आणि पूर्वेकडील राज्यांतील मध्यरात्रीच्या तापमानात झपाट्याने घसरण होत आहे. त्यात मध्य प्रदेश, छत्तीसगड, आेडिशा, पश्चिम बंगाल या राज्यात चांगलीच हुडहुडी भरू लागली आहे.  

 

दिल्लीत तापमान ८.६  
नवी दिल्ली- दिल्लीकरांनादेखील शनिवारची सकाळ हुडहुडी आणणारी होती. तापमान ८.६ अंश सेल्सियस असे नोंदवण्यात आले. सामान्यपणे हिवाळ्यातील सरासरी तापमानाहून ते नीचांकी होते, असा अनुभव दिल्लीकरांनी घेतला. दिवसभर निरभ्र आकाश होते. शुक्रवारी ७.६ तापमान होते. गेल्या अकरा वर्षांत पहिल्यांदाच एवढ्या तापमानाची नोंद झाली.  

 

सिमल्याहून चंदिगड, अमृतसरमध्ये जास्त थंडी  
सिमला हे थंड हवेचे ठिकाण आहे. निसर्गाची मुक्त उधळण असलेल्या शहरापेक्षा यंदा चंदिगड, अमृतसरमध्ये तापमानाचा पारा नीचांकीवर गेला आहे. सिमल्यात गेल्या काही दिवसांतील तापमानात तीन ते चार अंशांनी वाढ झाली. ३० नोव्हेंबरपर्यंत तरी प्रदेशात पावसाची शक्यता नाही, 

बातम्या आणखी आहेत...