आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

हुडहुडी : श्रीनगरमध्ये 10 वर्षांनी नोव्हेंबरमधील रात्रीच्या थंडीचा विक्रम, दिल्लीत सकाळ सर्वात थंड

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

दिल्ली/जम्मू - श्रीनगरमध्ये रात्रीच्या तापमानात प्रचंड घसरण पाहायला मिळत आहे. हवामान विभागाच्या मते, सुमारे 10 वर्षांनंतर नोव्हेंबर महिन्यात अशाप्रकारची प्रचंड थंडी पडत आहे. जम्मू आणि लेहमध्येही रात्रीच्या वेळी थंडी वाढत चालली आहे. दुसरीकडे दिल्लीमध्ये शुक्रवारी सकाळी या हंगामातील सर्वात कमी तापमानाची नोंद करण्यात आली. 


श्रीनगरमध्ये वाढतच चालली आहे थंडी 
- एका अधिकाऱ्याने सांगितले की, गुरुवारी रात्री श्रीनगरमध्ये तापमान उन्हे 3.1 डिग्रीपर्यंत पोहोचले. बुधवारी तामना 0.8 डिग्री एवढे होते. गेल्या 10 वर्षांतील नोव्हेंबरमधील रात्रीच्या वेळचा हा सर्वात कमी तापमानाचा विक्रम आहे. शहरामध्ये गेल्या पाच रात्रींमध्ये पारा सतत घसरत चालला आहे. 
- श्रीनगरमध्ये यावर्षी 23 नोव्हेंबरच्या आधी 28 नोव्हेंबर 2007 ला रात्रीच्या वेळी तापमान उन्हे 4.8 डिग्री सेल्सियस नोंदवण्यात आले होते. हे तापमान नोव्हेंबरमध्ये रात्रीच्या वेळी आतापर्यंतचे सर्वात कमी तापमान आहे. 


गुलमर्गमध्ये सर्वाधिक थंडी.. 
हवामान विभागाने म्हटले, गेल्या 4 दिवसांपासून काश्मीरचा भाग आणि लद्दाख भागात तपमान शून्यापेक्षा खाली आले आहे. शीतलहरीमुळे असे होत आहे. काश्मीर खोऱ्यात गुलमर्ग हा सर्वाधिक थंडी असलेला भाग असल्याचे समोर आले. गुरुवारी रात्री तर येथे तापमान उन्हे 6 अंशापर्यंत पोहोचले. पहलगाममध्ये रात्रीचे तापमान 5.4 डिग्री नोंदवण्यात आले. 


लेहमध्ये उन्हे 13.2 डिग्री टेम्परेचर
- लद्दाखच्या लेहमध्ये गुरुवारी रात्री तापमान उन्हे 13.2 डिग्री एवढे नोंदवण्यात आले. तर कारगिलमध्ये तापमान उन्हे 9 डीग्री राहिले. 
- हवामान विभागाने म्हटले आहे की, हवामान कोरडे राहील, पण दुर्गम भागांमध्ये पुढील दोन दिवस पावसाच्या हलक्या सरी कोसळण्याची शक्यता आहे. 

शुक्रवारी सकाळी दिल्लीमध्ये तापमान घसरले 
- दिल्लीमध्ये शुक्रवारची पहाट सर्वाधिक थंडीची ठरली. यते सकाळच्या वेळी तापमान 7.6 डिग्रीवर पोहोचले. हवामान विभागाने सांगितले की, नोव्हेंबरमध्ये पडणाऱ्या  थंडीपेक्षा हे सरासरी 4 डीग्री कमी आहे. 
- हवामान विभागाने दिल्लीमध्ये हवामान स्वच्छ राहण्याची आशा व्यक्त केली आहे. कमाल तापमान 26 डिग्रीच्या आसपास राहू शकते. गुरुवारी सकाळी तापमान 9.4 डिग्री होते आणि कमाल तापमान 25.6 डिग्री सेल्सिअस नोंदवण्यात आले. 

 

बातम्या आणखी आहेत...