आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

'बाय-बाय दोस्तो' म्हणत नदीत उडी मारुन आत्महत्या, कारण ऐकून बसेल धक्का

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अलाहाबाद (उत्तर प्रदेश)- 'बाय-बाय दोस्तो' म्हणत कॉलेज तरुणाने काल (सोमवार) फिल्मी स्टाईल यमुना नदीत उडी मारुन आत्महत्या केली. मित्र बघतच राहिले. त्यांच्यासमोरच तो काळाच्या उदरात समावला. त्याचे एका मुलीसोबत अफेअर सुरु होते. काही दिवसांपासून ती बोलत नव्हती. त्याने आत्महत्येची धमकी दिली होती. पण तरीही ती काही बोलेना. अखेर त्याने आत्महत्या केली असे मित्रांनी सांगितले.
अलाहाबाद विद्यापिठात बीकॉम थर्ड इअर होता
- निखिल चतुर्वेदी (वय 22) असे या आत्महत्या केलेल्या विद्यार्थ्याचे नाव आहे. विशाल कुमार आणि विक्रांतसोबत तो भाड्याच्या घरात राहत होता.
- तिघेही अलाहाबाद विद्यापिठात बीकॉम थर्ड इअरचे विद्यार्थी होते.
कोचिंगमध्ये मित्रांना सोडले, तो निघून गेला
- तिघे जॉर्ज टाऊन परिसरातील एका कोचिंग सेंटरवर आले होते. तिघे एकाच बाईकवर आले होते.
- पण निखिल दोघांना सोडून निघून गेला. काही वेळाने दोघे त्याची वाट बघत होते. पण तो आला नाही.
- विशालने त्याला फोन केला. पण फोन स्विच ऑफ होता. जरा वेळाने फोन लागला.
- विशालने विचारले तर निखिल म्हणाला- मी नवीन पुलावर आलोय. आत्महत्या करतोय.
- दोघे लगेच नवीन पुलावर गेले. तेथील पोल क्रमांक 18 जवळ निखिल उभा होता.
- दोघांनी सुटकेचा निःश्वास टाकला. तो सुखरुप होता. त्यांनी बाईक थांबवली.
- दोघे बाईक स्टॅंडवर लावणार तोच तो पुलाच्या रेलिंगवर चढला. आणि लगेच यमुनेत उडी मारली.
- दोघांनी निखिलचा हात पकडण्याचा प्रयत्न केला. मात्र तो सापडला नाही. तो मृत्युच्या जबड्यात अडकला.
गोताखोरांनी हे सांगितले
- निखिलने पुलावरुन उडी मारली. तो पाण्यात समावला गेला. त्याचा पाय यमुनेच्या तळात असलेल्या चिखलात रुतून बसला.
- उडी मारल्यानंतर तो एकदाही वर आला नाही. याचे हे कारण होते. तसेच त्याचा मृतदेहही पाण्यावर आला नाही.
पुढील स्लाईडवर बघा, या घटनेशी संबंधित फोटो....
बातम्या आणखी आहेत...