आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

एवढा भयंकर अपघात, इनोव्हाचे छत कापून काढावे लागले मृतदेह, रस्त्यावर रक्त अन् ऑइलचे मिश्रण

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
भटिंडा - राजस्थानच्या धार्मिक स्थळावर दर्शनासाठी जाणारे 7 जण अपघातात ठार झाले, तर 7 जण जखमी आहेत. मरणाऱ्यांत 4 जण एकाच कुटुंबाचे होते. कांसल येथील प्रतापसिंह हे कुटुंब व नातेवाइकांसह दर्शनासाठी राजस्थानच्या गुग्गा माडी येथे जात होते. गाडी त्यांचा मोठा मुलगा अनिल चालवत होता. बुधवारी दुपारी त्यांच्या गाडीची समोरून येणाऱ्या ट्रकशी भीषण धडक झाली होती.  
सूत्रांनुसार, अनिल ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न करत होता. यादरम्यान समोरून येणाऱ्या ट्रकला पाहून त्याचा गाडीवर कंट्रोल राहिला नाही. यामुळे इनोव्हाची ट्रकशी टक्कर झाली. सात जणांचा घटनास्थळीच मृत्यू झाला.
- मरणाऱ्यांमध्ये प्रताप सिंह, अनिल कुमार, लहान मुलगा सुनील कुमारची पत्नी आरती आणि नातू रितिक आहेत. तिघांची मात्र ओळख पटली नव्हती. तर रोहित, चंद्रभान, बिंद्रा, अजय आणि 11 वर्षांची लक्ष्मी गंभीर जखमी झाले. यापैकीही दोन जणांची ओळख पटू शकली नाही.
 
इनोव्हाची पूर्ण छत कापून काढावे लागले मृतदेह
- प्राथमिक तपासात अपघाताचे कारण ओव्हरटेक करताना झालेली चूक सांगितले जात आहे. सोबतच हेही समोर आले की, इनोव्हामध्ये 14 जण स्वार होते. यामुळे वजन जास्त झाल्याने ड्रायव्हर गाडीला कंट्रोल करू शकला नाही. अपघातानंतर ट्रक ड्रायव्हर घटनास्थळावरून फरार झाला. पोलिसांनी त्याच्याविरुद्ध गुन्हा नोंदवला आहे. कांसल गावाचे अनेक लोक दरवर्षी दिवाळीला राजस्थानच्या गुग्गामाडी येथे दर्शनासाठी येतात. या वेळी कांसा देवसी कॉलनीतील 14 जणांनी एकाच गाडीने जाण्याचे ठरवले होते. ओव्हरलोडिंग प्रमाणेच ओव्हरस्पीडही मृत्यूचे कारण ठरली. प्रत्यक्षदर्शींनी सांगितले, ज्या वेळी धडक झाली तेव्हा स्पीड एवढी जास्त होती की, धडकेनंतर इनोव्हा पार चेमटून गेली. जखमींना तसेच मृतांना बाहेर काढण्यासाठी इनोव्हाची पूर्ण छत कापून काढावी लागली. त्यानंतरच त्यांना दवाखान्यात नेता आले.
 
पुढच्या स्लाइड्सवर पाहा, या भीषण अपघाताचे आणखी काही फोटोज.... 
बातम्या आणखी आहेत...