आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Collision Of 18 Vehicles, 2 Died, More Than 20 Injured

हायवेवर एकमेकांवर एकापाठोपाठ एक आदळल्या 18 गाड्या, पहा छायाचित्रे...

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
झज्जर- रविवारी धुंध क्षेत्र परिसरात काळ आला होता. सकाळी सकाळीच झज्जर-रोहतक नॅशनल हायवेवरील गुढ़ा फ्लायओवरवर एकापाठोपाठ एक अशी 18 वाहने एकमेंकावर आदळली. यात दोघांचा मृत्यू झाला तर डझनभरापेक्षा जास्त जखमी झाले आहेत. मृतात एक 9 वर्षीय मुलीचा समावेश आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, रविवार सकाळी धुक्याने अचानक नखरे दाखविले. त्यामुळे अनेकांना रोडच दिसत नव्हता. त्यामुळे गुढ़ा फ्लायओवरवर रेवाडीकडून रोहतककडे जात असलेली 18 वाहने एकमेंकावर मागून आदळली. बहुतेक गाड्याचा वेग भरपूर झाल्याने मोठे नुकसान झाले.
धुक्याचे साम्राज्य अचानक समोर आल्याने चालकांना कोणताही पर्याय राहिला नाही. त्यामुळे झज्जरकडून चंदीगड महामार्गावरून जात असलेल्या एक रोडवेज, 8 कार व ट्रकसहित 18 गाड्या जोरदार एकमेंकावर आदळल्या.
या दुर्घटनेत लष्करातील एका माजी कर्नलाचा समावेश आहे. त्याला क्रेनच्या मदतीने कारमधून बाहेर काढण्यात आले. त्याची कार एका कंटेनरखाली घुसली होती. या घटनेत एकून दोघांचा मृत्यू झाला. तर 20 पेक्षा जास्त लोक गंभीर जखमी झाले आहेत. त्यांच्यावर रूग्णालयात उपचार सुरु आहेत.
पुढे स्लाईडच्या माध्यमातून पाहा, या अपघातातील PHOTOS...