आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Colonel Of Indian Army Santosh Mahadik Died In Encounter With Terrorists

J&K : दहशतवाद्यांबरोबर चकमक, कर्नल संतोष महाडीक शहीद, सर्च ऑपरेशन सुरू

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जम्मू-काश्मीरच्या कुपवाडा जिल्ह्यात एनकाऊंटरमध्ये शहीद झालेले आर्मीचे कर्नल संतोष महाडीक. - Divya Marathi
जम्मू-काश्मीरच्या कुपवाडा जिल्ह्यात एनकाऊंटरमध्ये शहीद झालेले आर्मीचे कर्नल संतोष महाडीक.
श्रीनगर - जम्मू-काश्मीरच्या कुपवाडामध्ये दहशतवादी आणि सुरक्षा रक्षकांमध्ये चकमक झाली आहे. त्यात जखमी झालेले आर्मीचे कर्नल संतोष महाडीक शहीद झाले. सोमवारी रात्री हे एन्काऊंटर सुरू झाले होते. कर्नल महाडीक मंगळवारी सकाळी जखमी झाले होते. यात जखमी झालेल्या इथर चार जवानांवर उपचार सुरू आहेत. दहशतवाद्यांकडे अत्याधुनिक शस्त्रे असून ते मोठ्या प्रमाणावर फायरिंग करत असल्याची माहिती मिळाली आहे.

कोण होते संतोष महाडीक...
> दहशतवाद्यांबरोबर चकमकीत शहीद झालेले संतोष महाडीक हे 41 राष्ट्रीय रायफल्सचे कमांडींग ऑफिसर होते.
> एका अधिकाऱ्याने सांगितले की, सर्च ऑपरेशनदरम्यान दहशतवाद्यांनी संतोष यांच्या टीमवर हाजी नाका येथील दाट जंगलामध्ये हल्ला केला. त्याचवेळी ते जखमी झाले होते.

कुपवाडामध्ये चकमकीचे प्रकार वाढले
> कुपवाडाच्या हाजी नाकाच्या दाट जंगलांमध्ये आणि आजुबाजुला दहशतवादी लपल्याची माहिती मिळाली होती.
> 13 नोव्हेंबरपासून येथे सर्च ऑपरेशन सुरू आहे. ऑपरेशनच्या पहिल्याच दिवशी दोन जवान गोळी लागून ठार झाले होते.
> कुपवाडामध्ये 10 नोव्हेंबरला आर्मीच्या जवानांनी एनकाऊंटरमध्ये एका दहशतवाद्याला कंठस्नान घातले होते.

चकमकीमागची कारणे...
> सुत्रांच्या मते, 30 अॉक्टोबरला पाकिस्तानमधून दहशतवाद्यांच्या एका गटाने भारतात घुसखोरी केली. त्यांच्या शोधासाठी सर्च ऑपरेशन राबवले जात आहे.
> गेल्यावर्षी जम्मू-काश्मीरमध्ये घुसखोरीचे 70 वेळा प्रयत्न झाले होते. 65 दहशतवादी एलओसी क्रॉस करण्यात यशस्वी झाले होते.
> 2013 मध्ये घुसखोरीचे 91 प्रयत्न झाले होते. तर 97 दहशतवादी भारतीय सीमेत घुसले होते.

पुढील स्लाइड्सवर पाहा, PHOTOS