आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कुटुंबियांना आवडत नव्हते याचे काम, वैयक्तिक आयुष्यात असा आहे \'गुत्थी\'

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मराठमोळी अभिनेत्री सोनालीसोबत सुनिल. - Divya Marathi
मराठमोळी अभिनेत्री सोनालीसोबत सुनिल.
अमृतसर (पंजाब) - कॉमेडी टीव्ही शो आवडत असलेल्या खचितच एखाद्याला 'गुत्थी' बद्दल माहित नसेल. फेसम कॉमेडियन सुनिल ग्रोव्हरची आज हे पात्रच ओळख आहे. त्याची वेगळी ओळख करुन देण्याची गरज नाही. “कॉमेडी नाइट्स विद कपिल’ मधील या कॅरेक्टरने त्याला प्रसिद्धी आणि पैसा दोन्ही मिळवून दिले आहे. 3 एप्रिल रोजी सुनिल एका कार्यक्रमानिमीत्त अमृतसरला आला होता. यावेळी त्याने आमची सहकारी वेबसाइट 'भास्कर'शी दिलखुलास गप्पा मारल्या. त्याने त्याच्या करिअर बरोबरच पर्सनल लाइफमधील अनेक गोष्टी यावेळी शेअर केल्या.
सुनिलच्या मुलाला त्याचे कोणते कॅरेक्टर नाही आवडत
- सुनिलने सांगितले, की एकीकडे लाखो प्रेक्षक त्याला गुत्थी या लेडिज कॅरेक्टरमध्ये पाहाण्यासाठी अतूर असतात तर, दुसरीकडे त्याच्या कुटुंबियांना त्या स्त्री रुपात पाहाणे अजूनही जड जाते.
- त्याचा सात वर्षांचा मुलगा मोहनने जेव्हा प्रथम त्याला या कॅरेक्टरमध्ये पाहिले तेव्हा त्याला ते विचित्र वाटले होते.
- त्याचे कारण होते, की बिल्डिंगमधील इतर मुले त्याला त्यावरुन चिडवायला लागले होते. तुझे वडील तर मुलीची भूमिका करतात, असे म्हणून त्याचे मित्र त्याल हिनवत होते. त्यामुळे त्याने वडिलांकडे असे रोल करु नका, असे आर्जवही केले होते.
- तेव्हा, सुनिलने त्याच्या लहानग्याला त्याच्याच भाषेत कलावंताचा धर्म समजून सांगितला होता. सुनिलने मोहनला सांगितले होते, 'जो कलावंत प्रत्येक भूमिका यशस्वी करुन दाखवतो तोच खरा कलावंत.'
- सुनिलने अमृतसर येथे माय एफएमच्या ऑफिसलाही भेट दिली. यावेळी त्याच्यासोबत बॉलिवूड अॅक्टर जिमी शेरगिल आणि अभिनेत्री श्रुति सोढी देखिल उपस्थित होती.
- कपिल त्याचा शो घेऊन आता 23 एप्रिलपासून पुन्हा प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. त्याच्या प्रमोशनसाठी मार्चमध्ये 'कॉमेडी नाइट्स..' ची पूर्ण टीमसोबत सुनिल अमृतसरला आला होता.

पंजाबमध्ये काय करत आहे सुनिल
- सुनिल पंजाबी फिल्म वैशाशी लिस्टच्या निमित्ताने पंजाबात आलेला आहे.
- या चित्रपटात जिमी आणि श्रुति देखिल दिसणार आहेत.
- 22 एप्रिल रोजी हा चित्रपट रिलिज होत आहे. त्याचा ट्रेलर 6 एप्रिलला लॉन्च झाला होता.
- याआधी सुनिलने अक्षयकुमारसोबत 'गब्बर इज बॅक' आणि आमिर खानसोबत 'गजनी'मध्ये झळकला होता.

हरियाणातून कसा पोहोचला मुंबईत
- सुनिल मुळचा हरियाणातील डबवाली येथील आहे. त्याचा जन्मही डबवाली येथेच झाला होता.
- पंजाब विद्यापीठाच्या नाट्यशास्त्र विभागातून पीजी पूर्ण केल्यानंतर अॅक्टिंगमध्ये नशिब आजमावण्यासाठी तो मुंबईला गेला.
- मुंबईने फार सहजा-सहजी त्याला स्विकारले नाही, मोठ्या स्ट्रगलनंतर त्याला काही चित्रपट आणि टीव्ही शो मिळाले. आता तो विदेशातही शो करतो. लवकरच तो कपिलच्या शोमधून पुन्हा प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.
- या शोबद्दल तो उत्साहितही आहे आणि त्याला काळजीदेखिल वाटत आहे. त्याने स्वतः विचारले की आता पुन्हा मी मुलीच्या भूमिकेत यावे का ?
- सुनिल किंगखान शाहरुखचा जबरा फॅन आहे. वास्तविक वैयक्तित आयुष्यात तो सामान्यांप्रमाणेच राहातो. त्याला निळा रंग अधिक आवडतो, तो स्मोकिंग करत नाही.
पुढील स्लाइडमध्ये,
>> कॉमेडी नाइट्स सोडल्यानंतच्या काय होत्या भावना...
>> कोण-कोणत्या स्टार्ससोबत स्क्रिन शेअर केली
>> कॉमेडीबद्दल काय म्हणतो सुनिल