आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

‘लष्कर’चा कमांडर अबू बकर ठार

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
श्रीनगर : जम्मू-काश्मीरमध्ये दोन ठिकाणी सुरक्षा दले आणि दहशतवादी यांच्यात चकमक उडाली. त्यात लष्कर-ए-तोयबाचा कमांडर अबू बकरसह दोन दहशतवादी ठार झाले. गेल्या अनेक दिवसांपासून सुरक्षा दलांच्या रडारवर असलेला अबू बकर काही दिवसांआधी झालेल्या चकमकीच्या वेळी वाचला होता.
बोमाई भागात काही दहशतवादी लपलेले आहेत, अशी माहिती सुरक्षा दलांना सकाळी मिळाली होती. त्यानंतर लष्कराने शोध मोही सुरू केली. एका घरात लपलेल्या दहशतवाद्यांनी गोळीबार सुरू केला. त्यानंतर दोन्ही बाजूंनी गोळीबार सुरू झाला. सात तास चाललेल्या कारवाईनंतर लष्कराने एका दहशतवाद्याला ठार केले. त्याचा मृतदेह ताब्यात घेतला तेव्हा तो पाकिस्तानमधील लष्कर-ए-तोयबा या दहशतवादी संघटनेचा कमांडर अबू बकर असल्याचे समजले. तदुसरी चकमक अनंतनाग जिल्ह्यातील बिजबेहाडा भागातील बेबुरा गावात झाली. तेथे गस्त घालणाऱ्या पथकावर दहशतवाद्यांनी हल्ला केला. त्यानंतर दोन्ही बाजूंनी गोळीबार सुरू होता. त्यात एक दहशतवादी ठार झाला. त्याचे इतर साथीदार पळून गेले.
दहशतवाद्याच्या मृत्यूच्या विरोधात निदर्शने
अनंतनागमध्ये मारल्या गेलेल्या दहशतवाद्याच्या मृत्यूनंतर स्थानिक लोकांनी सुरक्षा दलांविरोधात निदर्शने केली. त्याआधी दहशतवाद्यांना पळून जाण्याची संधी मिळावी यासाठी जमावाने खूप प्रयत्न केले. लोक दहशतवाद्याचा मृतदेह घेऊन जाण्यास विरोध करत होते. त्यानंतर अतिरिक्त दल बोलावण्यात आले. मृतदेह ताब्यात घेतला.
बातम्या आणखी आहेत...