आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

लग्नाच्या 5 महिन्यांनी छताला लटकली कमांडोची पत्नी, हातावर लिहिले होते असे काही

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जयपूर - आमेरमध्ये राहणाऱ्या एनएसजी कमांडो ट्रेनर भीमराज सैनीची पत्नी मीना (24) हिने लग्नाच्या 5 महिन्यांनंतर शनिवारी रात्री छताच्या रेलिंगला साडीने फास लावून आत्महत्या केली. रविवारी सकाळी माहिती मिळताच पोहोचलेल्या पोलिसांनी मृतदेह उतरवून रुग्णालयात पाठवला. येथे पोस्टमॉर्टमनंतर मृतदेह नातेवाइकांना सोपवण्यात आला. मृत मीनाच्या वडिलांनी तिचा पती भीमराजवर हुंडाबळीची तक्रार पोलिसांत दाखल केली आहे.

 

असे आहे प्रकरण...
- मीनाने मृत्यूआधी स्वत:च्या हातावर लिहिले की, माझ्याकडून घरातले एवढे काम होऊ शकत नाही. आणखी काहीतरी लिहिलेले होते, परंतु ते मिटले वा अर्धवट सोडण्यात आले. फक्त 5 महिन्यांपूर्वीच कमांडो ट्रेनर भीमराज यांच्याशी तिचे लग्न झाले होते.

- भीमराज नॅशनल सिक्युरिटी एजन्सी (एनएसजी)च्या मानेसर सेंटरमध्ये कमांडोजना ट्रेनिंग देतात. 4 दिवसांपूर्वीच ते सुटीवर घरी आले होते.

- लग्नानंतर पतीसोबत राहण्यासाठी एकदा मीना दिल्लीलाही गेली होती, पण काही दिवसांतच परत आली. प्राथमिक तपासात पतीशी भांडणाचे कारण समोर आले आहे. याचा तपास घेतला जात आहे. शनिवारी रात्री छतावर जाऊन लोखंडी रेलिंगला साडीचा फास लावून तिने फाशी घेतली.

 

पुढच्या स्लाइड्सवर पाहा, संबंधित आणखी फोटोज...

बातम्या आणखी आहेत...