आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राष्ट्रकुल परिषदेपासून भारत लांब राहणार: पाककडून वाद

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
रायपूर-सप्टेंबरमध्ये इस्लामाबादमध्ये होणाऱ्या राष्ट्रकुल संसदीय परिषदेपासून भारत लांब राहू शकतो. पाकिस्तान जम्मू-काश्मीरला भारताचा भाग मानत नसल्याने त्यांना परिषदेसाठी बोलावण्यात आले नाही. राष्ट्रकुल संसदीय परिषदेत लाेकसभा, राज्यसभा व राज्यांच्या विधानसभेच्या पीठासीन अधिकारी व सचिवाचा समावेश आहे. सर्वांना स्वतंत्र निमंत्रण पाठवले जाते. जम्मू-काश्मीर विधानसभेला स्वतंत्र निमंत्रण न मिळाल्याने भारतीय शिष्टमंडळ इस्लामाबाद परिषदेवर बहिष्कार टाकू शकते.
इस्लामाबादमध्ये ३० सप्टेंबर ते ८ ऑक्टोबरपर्यंत परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. पाकिस्तानच्या या भूमिकेमुळे भारतातील सर्व राज्यांनी इस्लामाबादला अद्याप प्रवास कार्यक्रम पाठवला नाही. तसेच त्यांनी सदस्यत्व शुल्कही जमा केले नाही. यामध्ये छत्तीसगड विधानसभेचे अध्यक्ष गौरीशंकर अग्रवाल आणि प्रमुख सचिव देवेंद्र वर्मा यांनाही सहभागी व्हायचे आहे. परिषदेत ५६ देशांच्या खासदारांसाठीच्या प्रस्तावित नियमावलीला मंजुरी द्यावयाची आहे. संसदीय संघामध्ये भारत केवळ प्रबळ सदस्य नव्हे, तर भारताच्या पावलांचा थेट परिणाम होतो.
अशा स्थितीत भारत परिषदेपासून दूर राहिल्यास संसदीय संघाला मोठा झटका मानला जाईल. लोकसभा अध्यक्ष सुमित्रा महाजन यासंदर्भात अंतिम निर्णय घेतील.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी चर्चा करून निर्णय ठरवतील.
अडेलतट्टू भूमिका
पाकिस्तान सरकारच्या अडेलतट्टू भूमिकेमुळे संघर्षाची स्थिती निर्माण झाली आहे. आम्ही भारत सरकारच्या परवानगीची वाट पाहत असून त्यानंतर निर्णय घेऊ.
गौरीशंकर अग्रवाल, विधानसभा अध्यक्ष, छत्तीसगड
बातम्या आणखी आहेत...