आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जाट मुलगा-मुस्लीम मुलीने विवाह केल्याने पंचायतीकडून गावात राहाण्यास बंदी

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बागपत (उत्तर प्रदेश) - युपीच्या बागपत जिल्ह्यात एकाच गावात राहणारा जाट मुलगा आणि मुस्लीम मुलीने विवाह केल्यानंतर गावात तणावाचे वातावरण आहे. दोघे एकाच गावचे असल्याने ते नात्याने भाऊ बहीण लागत असल्याचे पंचायतीचे म्हणणे आहे. या दोघांना गावात राहू दिले जाणार नसल्याचे पंचायतींचे म्हणणे आहे. दरम्यान, मुलीच्या कुटुंबीयांनी जीवाला धोका असल्याचे सांगत पोलिस संरक्षण मागितले आहे. पोलिसांनी त्यांनी संरक्षण पुरवण्याचे आश्वासन दिले आहे.

काय आहे प्रकरण...
बागपतमधील अमरदीपचे अनेक महिन्यांपासून गावातीलच इकरानाबरोबर अफेयर होते. पण कुटुंबीयांची त्याला मान्यता नव्हती. त्यामुळे इकराना आणि अमरदीप यांनी घरातून पळून जाऊन पाच जून रोजी विवाह केला होता. इकराना मंगळवारी मॅरेज सर्टिफिकेट घेऊन बागपतच्या जिल्हा कोर्टात पोहोचली. अमरदीपबरोबर आपल्या मर्जीनेच विवाह केल्याचा जबाब तिने दिला. तिने नाव बदलून अन्नू केले आहे.

गावात तणाव
पोलिसांनी मंगळवारी गावात नियोजित मुस्लिम महापंचायत होऊ दिली नाही. इतर जिल्ह्यांतून आलेल्या लोकांना गावाबाहेरच अडवून परत पाठवण्यात आले. पोलिसांनी मोठ्या प्रमाणावर बंदोबस्तही तैनात केला आहे.

कुटुंबीयांचे म्हणणे काय?
अमरदीप यांचे वडील देवेंद्र म्हणाले की, त्यांच्या मुलाने कुटुंबीयांच्या इच्छेविरोधात हा विवाह केला आहे. पण तरही त्यांनी दोघांचे नाते मान्य केले आहे. मात्र समाजाचा विचार करून तेही मुलगा आणि सुनेला गावात राहू न देण्याचे मत मांडत आहेत. दुसरीकडे इकरानाची आई मोहसिनाला जाट जावई नको आहे. गरीब असल्यामुळेच आपल्या मुलीबरोबर असे झाल्याचा दावा तिच्या आीने केला आहे.
बातम्या आणखी आहेत...