आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

झारखंड : राजधानी रांचीत धार्मिक दंगल, पोलिसाला तलवारीने भोसकले

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
लोकांनी केलेली जाळपोळ आणि शांतता प्रस्‍तापित करण्‍याचे आव्‍हान करताना मुख्‍यमंत्री. - Divya Marathi
लोकांनी केलेली जाळपोळ आणि शांतता प्रस्‍तापित करण्‍याचे आव्‍हान करताना मुख्‍यमंत्री.
रांची (झारखंड) - शहरात शुक्रवारी रात्री अज्ञात समाजकंटकांनी गोमास फेकल्‍याने धार्मिक वाद उफळला. यामध्‍ये एका गटाकडून प्रचंड तोडफोड आणि जाळपोळ करण्‍यात आली. दरम्‍यान, बंदोबस्‍तासाठी तैनात एका पोलिस कर्मचाऱ्याला तलवारीने भोसकले. शिवाय तुफान दगडफेक करण्‍यात आली. यात पोलिसांसह पत्रकार जखमी झाले. पोलिसांनी 60 पेक्षा अधिक व्‍यक्‍तींना ताब्‍यात घेतले असून, सध्‍या शहरात संचारबंदी लागू करण्‍यात आली आहे.
पोलिस अधीक्षकांची गाडीच्‍या काचा फोडल्‍या
या घटनेत काही व्‍यक्‍तींनी पोलिस अधीक्षकच्‍या (शहर) गाडीच्‍या काचा फोडल्‍या. शिवाय रस्‍त्‍यावर टायर जाळले. दरम्‍यान, मुख्यमंत्री रघुवीर दास यांनी घटनास्‍थळी येत शांतता प्रस्‍तापित करण्‍याचे आवाहन केले.
नेमके काय आहे प्रकरण?
रांचीमधील डोरंडा परिसरात शुक्रवारी रात्री गोमास फेकलेले दिसले. त्‍यामुळे संतप्‍त झालेल्‍या काही युवकांनी रस्‍त्‍यावर येत दगडफेक केली. दरम्‍यान, घटनेची माहिती मिळताच पोलिस आणि पत्रकार आले. त्‍या युवकांनी त्‍यांच्‍यावरही दगडफेक केली. यात दोन पोलिस कर्मचाऱ्यांसह स्‍थानिक वृत्‍तवाहिनीच्‍या दोन छायाचित्रकारांचे डोके फुटले. शनिवारी सकाळीसुद्धा लोकांनी एकत्र येत गोंधळ घातला.
कडक पोलिस बंदोबस्‍त
या घटनेनंतर शहरात कडक पोलिस बंदोबस्‍त असून, स्‍वत: डीआयजी तळ ठोकून आहेत. सीआरपीएफची तीन आणि सीमा सुरक्षा दलाची एक कंपनी तैनात करण्‍यात आली आहे.
पुढील स्‍लाइड्सवर पाहा संबंधित फोटोज...