आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

झारखंडच्या राजधानीत हिंसाचार, मध्यरात्री दोन समाजात धुमश्चक्री

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मध्यरात्रीपासून रांचीत पोलिस बंदोबस्त वाढविण्यात आला आहे - Divya Marathi
मध्यरात्रीपासून रांचीत पोलिस बंदोबस्त वाढविण्यात आला आहे
रांची - झारखंडची राजधानी रांचीमध्ये सोमवारी रात्री पुन्हा हिंसाचार भडकला होता. येथील डोरंडा पोलिस स्टेशनच्या हद्दीतील गौसनगरमध्ये मध्यरात्री एका विशिष्ट समुदाच्या लोकांनी एक ऑटो रिक्शा आणि दोन घरांना आग लावली. त्यानंतर दोन समाजांमध्ये धुमश्चक्री उडाली. मंगळवारी सकाळी देखली येथे तणावाची परिस्थिती आहे. रात्री पोलिसांनी जमावाला शांत करण्यासाठी अनेक राऊंड फायर केले. हिंसाचाराच्या घटनेनंतर सुरक्षा व्यवस्था वाढविण्यात आली आहे.

रात्रभर धुमश्चक्री
मिळालेल्या माहितीनूसार, रात्री साधारण 12 वाजता गौसनगर मध्ये घुसून समाज कंटकांनी फायरिंग देखील केली. पोलिसांनी शांततेचे आवाहन केले होते.

पोलिस काय म्हणतात
रांचीचे पोलिस आयुक्त प्रभागकुमार यांनी फायरिंग झाल्याच्या वृत्ताला दुजोरा दिला आहे. एडीजी अनुराग गुप्ता म्हणाले, 'घटनेची माहिती मिळाल्यानंतर पोलिस आयुक्तांसह सर्व वरिष्ठ पोलिस अधिकारी, सीआरपीएफचे जवान घटनास्थळी रवाना झाले होते.' रांचीचे उपायुक्त मनोज कुमार म्हणाले, तणाव वाढल्यानंतर त्या परिसरात कलम 144 लागू करण्यात आली आहे. पोलिसांनी चार जणांना ताब्यात घेतले आहे.

संचारबंदी सारखी परिस्थिती
मंगळवारी शहरातील अनेक शाळा बंद आहेत. ज्या शाळा उघडल्या होत्या तिथे शिक्षकांनी पालकांना मुलांना परत घेऊन जाण्यास सांगितले आहे. रांची विद्यापीठाने आज होणाऱ्या परीक्षा रद्द केल्या आहेत. रांची महिला महाविद्यालयाने विद्यार्थिनींना सुटी दिली आहे.

काय आहे प्रकरण
मागील आठवड्यात शुक्रवारी रात्री रांचीमधील डोरंडा भागात कथितरित्या जनावराचे मांस आढळून आले होते. त्यानंतर काही युवकांनी रस्त्यावर जाळपोळ केली. पोलिसांवर दगडफेक करण्यात आली यामुळे वातावरण चिघळले होते. शनिवारी सकाळी या भागात शेकडो लोक रस्त्यावर आले. काही हिंदू संघटनांचे लोकही तिथे पोहोचले आणि दुकाने बंद केली. रविवारी सकाळी देखील या भागात तणावाची परिस्थिती होती.
पुढील स्लाइडमध्ये पाहा, रांचीमधील बंदोबस्त