आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

नवा दूरसंचार उपग्रह जीसॅट-१८चे प्रक्षेपण

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बंगळुरू - दूरसंचार क्षेत्र अधिक भक्कम करण्याच्या दृष्टीने भारताने गुरुवारी जीसॅट-१८ या नव्या दूरसंचार उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण केले. फ्रेंच गयानातील कौरवू केंद्रावरून हा उपग्रह अवकाशात सोडण्यात आला.

आगामी काळात या उपग्रहामुळे दूरचित्रवाणी, दूरसंचार, व्हीसॅट आणि डिजिटल सॅटेलाइट न्यूज या क्षेत्रात मोठी मदत िमळणार आहे. एरियन-५ या रॉकेटच्या मदतीने पहाटे २च्या सुमारास हा उपग्रह अवकाशात झेपावला. भारतीय अंतराळ संशोधन केंद्राच्या (इस्रो) कार्यरत असलेल्या १४ दूरसंचार उपग्रहांची कार्यक्षमता वाढवण्याच्या दृष्टीने या उपग्रहाची मदत होणार आहे. प्रक्षेपणानंतर ३२ मिनिटे २८ सेकंदांनी जीसॅट-१८ एरियन-५ पासून विभक्त झाला आणि पृथ्वीपासून २५१.७ किमी उंचीवर भूस्थिर कक्षेत स्थिरावला.

राष्ट्रपती प्रणव मुखर्जी, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या उपग्रहाच्या यशस्वी प्रक्षेपणाबद्दल इस्रोच्या शास्त्रज्ञांचे अभिनंदन केले आहे. भारतीय अवकाश कार्यक्रमात या उपग्रहाच्या माध्यमातून मैलाचा दगड जोडला गेल्याचे मोदी यांनी म्हटले आहे.
बातम्या आणखी आहेत...