आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दुग्धजन्य मिठायांवर "ट्रीहेलोज'चा उल्लेख अनिवार्य, लेबल नसल्यास कारवाई

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जयपुर - गुलाब जामून, रसगुल्ला, पेढा इत्यादी दुधापासून तयार करण्यात येणा-या मिठायांच्या सीलबंद डब्यांवर "मिठाईत ट्रीहेलोजचे प्रमाण' हा संदेश असलेले लेबल लावणे अनिवार्य झाले आहे. ट्रीहेलोज कार्बोहायड्रेट हा एक प्रकारचा गोड पदार्थ (स्वीटनर) असून यामुळे रक्तदाब वाढ व पोटाशी संबंधित आजार जडू शकतात. अशाप्रकारचे लेबल न लावलेले पदार्थ बाजारात आढळून आल्यास त्यांच्यावर कठोर कारवाई केली जाणार आहे. फूड सेफ्टी अँड स्टँडर्ट अथॉरिटी ऑफ इंडियाने अन्न सुरक्षा व परिमाण घटना दुरुस्ती २०११ नुसार याबाबतची अधिसूचना जारी केली आहे. राजस्थानाचे राज्य नोडल अधिकारी डॉ. आदित्य आत्रेय व मुख्य आरोग्य अधिकारी डॉ.रवी शर्मा यांनी दिलेल्या माहितीनुसार, केंद्र सरकारची ही अधिसूचना तत्काळ प्रभावाने लागू झालेली आहे.

लेबल अनिवार्य
बिस्किट, ब्रेड, केक, कार्बोनेटेड वॉटर, फळांचा रस, फ्रूट बेव्हरेज व स्क्वॅश, जॅम, जेली, दूध पावडर, डेअरी आधारीत पेय, रसगुल्ला, गुलाब जामून, जिलेबी, बुंदीचे लाडू, म्हैसूर पाक, मेक्रोनी प्रॉडक्ट, नूडल्स, पास्ता, कन्फेक्शनरी आणि कँडीजच्या पाकिटांवर त्यात ट्रीहेलोज असल्याचे लेबल लावणे अनिवार्य आहे.
इशारा आवश्यक
दुग्धजन्य उत्पादने, स्पाइसमध्ये प्लांट स्टेनोल इस्टरचा वापर केल्यास त्याबाबतचा इशारा उत्पादनावर लिहावा लागेल. कोलेस्टेरॉल कमी करण्याची औषधी घेणाऱ्यास डॉक्टरांच्या सल्ल्यानेच उत्पादने घेता येईल, गर्भवती, ५ वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलांसाठी उपयोगी नाही, हा इशारा त्यात असावा. व्यक्तीने दररोज ३ ग्रॅमपेक्षा अधिक स्टेरॉल, स्टेनॉल किंवा त्यांचे मिश्रण घेऊ नये.
कोणत्या पदार्थात किमी प्रमाण
पदार्थ ट्रीहेलोजचे प्रमाण
बिस्किट, ब्रेड, केक ०.५ ते १० टक्के
जॅम, जेली, दूध पावडर, रस ०.५ ते २० टक्के
दूधापासून तयार गुलाब जामून, रसगुल्ले ०.५ ते २० टक्के
मेक्रोनी प्रॉडक्ट, नूडल्स व पास्ता .५ ते ५ टक्के
स्वीट अँड कन्फेक्शनरी, कँडीज ०.५ ते ७.५टक्क्े
बातम्या आणखी आहेत...