आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राजस्थानचे माजी मुख्यमंत्री अशोक गहलोत यांच्या मुला विरोधात 'ईडी'कडे तक्रार

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
राजस्थानचे माजी मुख्यमंत्री अशोक गहलोत यांचे चिरंजीव वैभव. - Divya Marathi
राजस्थानचे माजी मुख्यमंत्री अशोक गहलोत यांचे चिरंजीव वैभव.
जयपूर (राजस्थान)- काँग्रेस नेते आणि माजी मुख्यमंत्री अशोक गहलोत यांचा मुलगा वैभव आणि त्यांच्या कंपनीविरोधात अंमलबजावणी संचालनालयाकडे (ईडी) तक्रार करण्यात आली आहे. वैभव यांच्यावर आरोप आहे, की त्यांनी स्वतःची कंपनी तयार केली आणि आपल्याच मालकीच्या दुसऱ्या एका कंपनीला शेअर जास्त भावात विकले.

काय आहे आरोप?
ईडीकडे आलेल्या तक्रारीत म्हटले आहे, की वैभव यांनी 15 मार्च 2007 ला ट्रायडंट हॉटेल रिसॉर्ट प्रा. लिमिटेड नावाने कंपनी स्थापन केली. या कंपनीचे शेअर त्यांनी मॉरिशसची कंपनी शिवानारला जवळपास 40 हजार रुपयांना एक शेअर दराने विकले. वास्तविक त्यांच्या कंपनीच्या शेअरची किंमत तेव्हा केवळ 87 रुपये होती. 31 मार्च 2011 ला कंपनीच्या 5.40 लाख शेअरमधील जवळपास 2.52 लाख शेअर शिवानारने खरेदी केले होते. आरोप आहे, की मॉरिशसच्या या कंपनीचा पत्ता बनावट आहे. ती कंपनीही बनावट असून कंपनी गहलोत यांच्याच मालकीची आहे.
तक्रारीसोबत पुरावे देखील
वैभव गहलोत यांच्याविरोधात ईडीकडे जन समस्या निवारण मंचचे प्रमुख सूरज सोनी यांनी तक्रार दाखल केली आहे. त्यांनी तक्रारीसोबतच सर्व पुरावे सादर केले आहेत. सोनी यांनी वैभव यांच्या कंपनीचे बॅलेन्स शीट, त्यांच्या कंपनीने खरेदी-विक्री केलेल्या शेअरची माहिती पुरावा म्हणून ईडीला सादर केली आहे. उल्लेखनिय बाब म्हणजे काही दिवसांपूर्वी वैभव यांच्या कंपनीविरोधात भाजप प्रदेशाध्यक्ष अशोक परनामी आणि संसदीय कार्य राज्यमंत्री राजेंद्र राठोड यांनीही आरोप केले होते.
पुढील स्लाइडध्ये पाहा अशोक गहलोत यांचे छायाचित्र..
बातम्या आणखी आहेत...