आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Compromise Fine In Rape Case Where Accused And Victim Happily Married High Court

'पीडित आणि आरोपी जर सुखाने नांदत असतील तर रद्द होईल बलात्काराचा गुन्हा'

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
चंदीगड - पंजाब-हरियाणा हायकोर्टाने प्रेम प्रकरणातील बलात्कार प्रकरणात महत्त्वाचा निकाल दिला आहे. बलात्काराचा आरोप आणि नंतर दोघांनी लग्न करुन सुखी संसार सुरु केला असेल तर बलात्काराची केस रद्द करण्याचा आदेश कोर्टाने दिला आहे. तसेच लग्नानंतर जर दोघे आनंदाने राहात असतील तर आरोपीविरोधातील बलात्काराचा गुन्हा रद्द केला जाऊ शकतो. हायकोर्टाने हा निर्णय प्रेम प्रकरणातील बलात्काराच्या आरोपावरील सुनावणीत दिला आहे. यात तरुणीने कुटुंबियांच्या दबावत येऊन तरुणावर बलात्काराचा आरोप केला होता. मात्र नंतर तिने त्याच तरुणाबरोबर लग्न केले होते.
हायकोर्टाचे न्यायाधीश राजमोहन सिंह यांनी या प्रकरणात बलात्काराचा गुन्हा रद्द करण्याचे आदेश देताना सांगितले, 'अशी अनेक प्रकरणे असतात ज्यात अशा प्रकारचे गुन्हे दाखल केले जातात आणि ते वर्षानुवर्षे कोर्टात चालत असतात. अशा प्रकारच्या गुन्हेगारी केसेस चालत राहिल्यास त्यांच्या वैवाहिक जीवनावर याचा वाईट परिणाम होण्याची शक्यता असते.'
काय आहे प्रकरण
संगरुर जिल्ह्यातील सुनाम टाऊन येथील रहिवासी युवक-युवतीचे एकमेकांवर प्रेम होते. त्याला घरच्यांचा विरोध असल्यामुळे ते पळून गेले. त्यांना पकडून आणल्यानंतर 25 सप्टेबर 2014 रोजी मुलीच्या कुटुंबियांनी तिच्यावर दबाव टाकून मुलाविरुद्ध बलात्काराची तक्रार दाखल करायला लावली. मात्र त्यानंतर काहीच दिवसांनी दोघांच्याही घरच्यांनी त्यांचे नाते स्विकारले आणि 28 सप्टेंबर 2014 रोजी गुरुद्वाऱ्यात त्यांचे लग्न लावून देण्यात आले. पंजाब कंपलस्परी रजिस्ट्रेशन ऑफ मॅरेज अॅक्ट 2012 नुसार त्यांची विवाह नोंदणी करण्यात आली. मात्र मुलाविरुद्ध असलेला बलात्काराचा खटला सुरुच राहिला. त्यानंतर त्या तरुणाने हायकोर्टात याचिका दाखल करुन बलात्काराचा खटला रद्द करण्याची मागणी केली. हायकोर्टाने दोघांनाही (मुलाग - मुलगी) कोर्टात हजर राहाण्यास सांगितले आणि त्यांच्याकडून वदवून घेतले की लग्नानंतर आम्ही दोघेही एकत्र आनंदत राहात आहोत.
गेल्या आठवड्यात दिलेल्या निर्णयात कोर्टाने म्हटले आहे, की भलेही हे प्रकरण 376 नुसार दाखल झाले असेल पण ते दोघांच्या प्रेम प्रकरणादरम्यानचे आहे. या प्रकरणात गुन्हेगारी स्वरुपाचा खटला सुरु राहिला तर कायद्यासमोर निर्णय घेण्याचीअडचण निर्माण होईल. योग्य न्याय तेव्हाच होऊ शकतो जेव्हा एफआयआर रद्द होईल.