आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

NO BAIL: या बाबाच्या आश्रमात सापडले होते कंडोम; लेडीज टॉयलेटमध्ये CCTV कॅमेरे

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
हिसार / नवी दिल्ली- सतलोक आश्रमाचा संचालक बाबा रामपाल याला सुप्रीम कोर्टाने जबरदस्त झटका दिला आहे. रामपाल याला जामीन देण्यास कोर्टाने स्पष्ट नकार दिला आहे. न्यायमूर्ती रंजन गोगई यांच्या अध्यक्षतेखालील न्यायपीठाने रामपाल याचा जामीन फेटाळून लावला.

'तुम्ही ज्यूनियर इंजिनिअरपासून थेट धर्मगुरु बनले आहे. तुम्ही पोलिसांवरही हल्ला केला आहे. तुमच्या विरोधात सर्व पुरावे आहेत. तुम्हाला तुरंगातच राहावे लागेल,' अशा शब्दात कोर्टाने रामपालला फटकारले आहे.

वाचा, एकेकाळी रामपाल याचा असा होता थाट....
- रामपाल यांचा सतलोक आश्रमात एक स्विमिंग पूल आहे.
- या स्विमिंग पूलमध्ये रामपाल चक्क दूधाने अंघोळ करत असे. नंतर या दूधाची खीर बनवली जात होती. ही खीर भक्तांंना प्रसाद म्हणून दिली‍ जात होती.
-आपण संत कबीराचा अवतार असल्याचे रामपाल भक्तांना सांगत असेे.

तुरुंगात अंघोळीसाठी गरम पाणी मिळत नाही...
-अतिरिक्त न्यायाधीश एस.के.शर्मा यांच्या कोर्टात हत्याकांडप्रकरणी रामपाल यांची व्हिडिओ कॉन्फ्रेंसिंगद्वारा सुनावणी झाली.
-रामपाल यांची पत्नी, कन्या व सूनने कोर्टात प्रतिज्ञापत्र सादर केले. तुरुंगात रामपाल यांना अंघोळीसाठी गरम पाणी व रात्री अंगावर ओढण्यासाठी कांबळ मिळत नसल्याचा आरोप करण्यात आला आहे.
- कोर्टाने प्रतिज्ञापत्र स्विकारले असून पुढील सुनावणी 25 मार्चला होणार आहे.
-चार गुन्ह्यांप्रकरणी रामपाल यांना 14 मार्चला कोर्टात हजर करण्यात येणार आहे.
-रामपाल व त्यांच्या समर्थकांवर हत्येचा गुन्हा आहे.

रामपाल दास असा बनला 'बाबा रामपाल'
- ज्यूनियर इंजिनिअर म्हणून नोकरी करत असलेला रामपाल दास सत्संग करायला लागला. नंतर तो स्वयंघोषित 'बाबा रामपाल' बनला.
- हरियाणा सरकारने रामपालकडून 2000 मध्ये राजीनामा घेतला होता.
-नंतर त्याने करोंथा गावात स्वत:चा सतलोक आश्रम सुरु केला.
-रामपाल सध्या तुरुंगात आहे. त्यांच्यावर हत्येचा गुन्हा आहे.

पुढील स्लाइडवर वाचा, सतलोक आश्रमात सापडले होते कंडोम आणि अश्लील साहित्य...
बातम्या आणखी आहेत...