आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

अनुप्रिया पटेल मंत्री होताच ‘अपना दल’मध्ये फूट, कृष्णा पटेलांनी संपवले संबंध

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
लखनऊ - उत्तर प्रदेशातील अपना दलच्या नेत्या अनुप्रिया पटेल यांना केंद्रात राज्यमंत्रिपद मिळाल्याने अपना दलच्या अध्यक्षा कृष्णा पटेल नाराज झाल्या असून त्यांनी अपना दल तसेच भाजपशी संबंध तोडत असल्याची घोषणा केली आहे.

मोदी कॅबिनेटच्या विस्तारात अपना दलच्या खासदार अनुप्रिया पटेल यांना राज्यमंत्रीपद देण्यात आले आहे. याबाबत अपना दलच्या अध्यक्ष कृष्णापटेल यांनी एनडीए आघाडीशी संबंध तोडत असल्याची घोषणा केली. परंतु पक्षाचा जनाधार अनुप्रिया पटेल यांच्यासोबत असल्याचे दिसत आहे. त्यावर विचार करण्यासाठी त्यांनी पक्षाच्या पदाधिकाऱ्यांची गुरुवारी बैठक बोलावली आहे. लखनऊ येथील पक्ष कार्यालयात सर्व पदाधिकाऱ्यांना तातडीने हजर राहण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

कृष्णा पटेल या अनुप्रिया यांची आई आहेत. त्यांनी सांगितले की, त्यांची मुलगी अनुप्रियाचा आता पक्षाशी कुठलाही संबंध नाही. त्यांना २०१५ मध्येच पक्षविरोधी कारवायांसाठी काढून टाकण्यात आले आहे. आता त्या अपना दलच्या खासदारही नाहीत व सदस्य नाही. भाजपशीची आमचा काहीही संबंध नाही.

आमचा पक्ष एनडीएचा घटक नाही.अपना दलचे संस्थापक सोनेलाल पटेल यांचा रस्ते अपघातात मृत्यू झाल्यानंतर अनुप्रिया पटेल यांनी पक्षाची सूत्रे हाती घेतली होती. लोकसभा िनवडणुकी भाजपशी युतीवरून आई व मुलीमध्ये मतभेद झाले. जानेवारी २०१५ मध्ये अनुप्रियाला पक्षातून काढण्यात आले होते.

(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)

बातम्या आणखी आहेत...