आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Confustion Over The Mid Day Meal In Bihar Assembly

‘मिड-डे र्मडर’वरून बिहार विधानसभेत रणकंदन!

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पाटणा - मध्यान्ह भोजनामुळे सारण जिल्ह्यात 23 विद्यार्थ्यांचे बळी गेल्याच्या घटनेचे सोमवारी विधिमंडळात पडसाद उमटले. आक्रमक आमदारांमुळे विधानसभा व विधान परिषदेचे कामकाज तहकूब करावे लागले.

विधानसभेचे कामकाज सुरू झाल्यानंतर विधानसभा अध्यक्ष उदय नारायण चौधरी यांनी प्रश्नोत्तराच्या तासाची घोषणा केली. विरोधी भाजप आमदारांनी सर्व कामकाज रद्द करून मध्यान्ह भोजन दुर्घटनेवर चर्चा करण्याची मागणी केली. निष्पाप बालकांच्या मृत्यूच्या विषयापेक्षा अन्य कोणताही गंभीर विषय नाही, त्यामुळे याच मुद्दय़ावर चर्चा करण्याची मागणी विरोधी पक्षनेते नंदकिशोर यादव यांनी केली.

प्रश्नोत्तराच्या तासानंतरच त्यावर चर्चा केली जाईल, असे चौधरी म्हणाले. यानंतर भाजप आमदारांनी त्यावर नाराजी व्यक्त करत विधानसभा अध्यक्षांसमोरील मोकळ्या जागेत गोंधळ घालण्यास सुरुवात केली. गोंधळादरम्यान मंत्री रेणू कुशवाह यांनी भाजप सदस्यांकडील पोस्टर घेऊन डेस्कखाली ठेवले. विधानसभा अध्यक्षांनी आमदारांना शांत करण्याचा प्रयत्न केला, मात्र त्यात त्यांना यश आले नाही व यातच दुपारी 12.00 पर्यंत कामकाज तहकूब करण्यात आले. भाजप व जदयू आमदारांच्या परस्परविरोधी घोषणाबाजी दरम्यान कॉँग्रेस आणि राजदचे आमदार शांत होते.


नोटिसीवरून भाजप आक्रमक
दुपारी पुन्हा कामकाजाला सुरुवात झाल्यानंतर भाजप आमदारांनी घोषणाबाजी सुरूच ठेवली. मध्यान्ह भोजनाच्या चर्चेसंदर्भात दोन नोटिसा प्राप्त झाल्याची माहिती विधानसभा अध्यक्षांनी दिली. राजदचे गटनेते अब्दुल बारी सिद्दिकी व भाजप आमदार विनोद नारायण झा यांनी या नोटिसा दिल्या होत्या. सिद्दिकी यांची नोटीस पहिल्यांदा मिळाल्यामुळे त्यावर अडीच वाजता चर्चा होईल, अशी घोषणा चौधरी यांनी केली. अध्यक्षांच्या कार्यालयामध्ये मी सकाळी 8.00 वाजता आलो होतो. विधानसभा सचिव 9.00 वाजता आले होते, त्यामुळे सिद्दिकींनी माझ्याआधी कशी नोटीस दाखल केली, असा सवाल झा यांनी केला.