आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराअहमदाबाद- गुजरातमधील निवडणूक प्रचार माेहिमेच्या अंतर्गत १ काेटी घरांपर्यंत पाेहाेचण्याचे उद्दिष्ट प्रमुख विराेधी पक्ष असलेल्या काँग्रेसने निश्चित केले. मतदारांसाठी थेट संपर्क साधण्याच्या रणनीतीचा हा भाग अाहे.
काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष तथा माजी केंद्रीय मंत्री भरतसिंह साेलंकी, प्रदेश प्रभारी अाणि राजस्थानचे माजी मुख्यमंत्री अशाेक गहलाेत यांनी भाजप अध्यक्ष अमित शहा यांच्या नारायणपुरा मतदारसंघाचा दाैरा केला. स्थानिक मतदारांशी प्रत्यक्ष चर्चा केली. या भेटीनंतर गहलाेत म्हणाले, मतदारांमध्ये सरकारविराेधी भावना संतप्त असून या वेळी काँग्रेस पक्षास अधिक अनुकूल वातावरण अाहे. लाेकांकडून उपस्थित केले जाणारे मुद्दे विचारात घेऊन त्याचा अंतर्भाव निवडणूक पार्श्वभूमीवरील व्हिजन डाॅक्युमेंटमध्ये करणार अाहाेत. काँग्रेसची ही माेहीम राज्यभर १५ दिवस चालणार अाहे.
दरम्यान, यापूर्वी सत्तारूढ भाजपनेदेखील घराेघरी जाऊन मतदारांशी थेट संपर्क साधला हाेता. अमित शहा यांच्यासाेबत केंद्रीय मंत्रीदेखील माेठ्या प्रमाणावर या संपर्क माेहिमेत सामील झाले हाेते. अाता भाजपच्या पावलावर पाऊल टाकत काँग्रेसने मतदारांना रिझवण्यासाठी अभियान सुरू केले अाहे.
हार्दिकच्या सीडीमागे भाजपचा हात : सिद्धार्थ पटेल
काँग्रेसचे माजी अध्यक्ष सिद्धार्थ पटेल हे हार्दिक पटेलच्या बचावासाठी सरसावले. जनतेकडून हाेत असलेल्या विराेधामुळे भाजप संत्रस्त झाली असून यापेक्षाही खालच्या थराला जाऊ शकतो. हार्दिक पटेलची कथित सीडी व्हायरल करण्यामागे भाजपचा हात असून येत्या दाेन दिवसांत भाजप अाणखी खालच्या थराला जाऊ शकतो, असा अाराेप त्यांनी केला.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.