आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बचाव कार्याचे श्रेय लाटण्यावरून काँग्रेस आणि टीडीपीच्या खासदारांमध्ये \'सिनेस्टाईल\'

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

डेहराडून- उत्तराखंडामध्ये आलेल्या नैसर्गिक प्रकोपानंतर सर्वत्र हाहाकार उडाला असताना बचाव कार्याचे श्रेय लाटण्यावरून राजकीय नेत्यांची स्पर्धा सुरु झाली आहे. महाप्रलयानंतर काँग्रेस सरकारने वृत्तपत्रांतून जाहिरातींची मालिका सुरू केली असताना आज (गुरुवारी) काँग्रेस आणि तेलुगू देसम पक्षाच्या (टीडीपी) खासदारांनी तर मर्यादाच ओलांडली.

डेहराडून विमानतळावर तेलगू देसमचे खासदार रमेश राठोड व काँग्रेसचे खासदार व्ही हणुमंत राव समोरासमोर भिडले आणि आपणच या यात्रेकरूंना आंध्रप्रदेशमध्ये पोचवणार असा पवित्रा त्यांनी घेतला. वाद आणखीच चिघळल्यानंतर तर दोन्ही खासदारांमध्ये अक्षरश: 'सिनेस्टाईल झटापटही झाली.

दरम्यान, बचाव कार्यादरम्यान गौरीकुंडाजवळ काल (मंगळवारी) हवाई दलाचे हेलिकॉप्‍टर कोसळून शहिद झालेल्या 20 जवानांचे मृतदेह ताब्यात घेण्यात आले आहे. शहीद जवानांचे मृतदेह शोधण्यासाठी लष्कराच्या विशेष पथकातून 26 आणि 12 एलीट गरुड कमांडो गेले होते.

शहीद झालेल्या जवानांची नावे वाचण्‍यासाठी पुढील स्लाइड्‍सवर क्लिक करा..