आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

सर्वात कमी फरकाने भाजपने काबीज केलेल्या सुरतच्या 6 जागांवर काँग्रेसचे विशेष लक्ष

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सुरत- सुरतच्या १२ विधानसभा मतदारसंघांपैकी ६ जागांवर काँग्रेस विशेष लक्ष देत अाहे. कारण या जागा २० ते ३० हजार मतांच्या फरकांनी २०१२ च्या निवडणुकीत भाजपने काबीज केल्या अाहेत. या सहा जागांमध्ये लिंबायत, अाेलपाड, सुरत (उ.), वराछा, सुरत (पूर्व) अाणि उधना यांचा समावेश अाहे. 


काँग्रेसच्या मते पाटीदार अांदाेलन अाणि गेल्या पाच वर्षांत बदललेल्या राजकीय समीकरणांमुळे या खेपेच्या निवडणुकीत या जागा काँग्रेसला फायदेशीर ठरू शकतील. विशेषत: वराछा, सुरत (उ.) अाणि अाेलपाड विधानसभा मतदारसंघात भाजपवर नाराज असलेले पाटीदार मतदार काँग्रेसकडे वळू शकतात. काँग्रेसचे कार्यकर्तेदेखील जाेमाने कामाला लागले अाहेत. 

 

हे ही वाचा...
>हार्दिक रटेलसमाेर अडचणींचा डाेंगर, ट्विट केल्या वाजपेयींच्या कविता
>गुजरात निवडणूक: ‘हम साथ साथ है’पासून ते ‘हम अापके है काैन’पर्यंत!


पुढील स्लाइडवर जाणून घ्या सहा ठिकाणचे राजकीय समीकरणे....

बातम्या आणखी आहेत...