आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Congress BJP Quarraling Among Over The Ishrat Jahan Fake Encounter

इशरत जहाँ बनावट चकमक प्रकरणी काँग्रेस-भाजपमध्ये वातावरण तापले

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

गुवाहाटी - इशरत जहाँ बनावट चकमक प्रकरणात आरोपपत्र दाखल करण्यात आले आहे. त्यावरून देशातील प्रमुख राजकीय पक्षांकडून नव्याने मतभेद व्यक्त झाले आहेत. काँग्रेस व भाजप यांच्यात गुरूवारी पुन्हा शाब्दिक चकमकी उडाल्या.


इशरत जहाँचा दहशतवाद्याशी काही संबंध आहे किंवा नाही याचा सुरूवातीला तपास केला गेला पाहिजे. देशात 2003 पूर्वी सुमारे 3000 चकमकी झाल्या. या गोष्टीचा काँग्रेसला विसर पडला असून केवळ राजकीय फायदा घेण्यासाठी या प्रकरणाचा बाऊ केला जात आहे, असे भाजप अध्यक्ष राजनाथ सिंग यांनी म्हटले आहे. त्यासाठी सीबीआयचा गैरवापर केला जात आहे, असाही आरोप त्यांनी केला. ते गुवाहाटी येथे पत्रकारांशी बोलत होते.


केंद्रीय मंत्री कपिल सिब्बल यांनी राजनाथसिंग यांच्या प्रतिक्रियेवर टीका केली. इशरत प्रकरणी सिंग यांची प्रतिक्रिया भावनिक आहे. कारण हे प्रकरण सीबीआय पाहत असल्याचे त्यांचे म्हणणे आहे.


वास्तविक, न्यायालयाच्या देखरेखीखाली याचा तपास केला जात आहे. खरे तर त्यांनी नरेंद्र मोदींना गुजरातमध्ये असे का घडले, अशी विचारणा केली पाहिजे, असे सिब्बल म्हणाले. ते दिल्लीत प्रसारमाध्यमाशी बोलत होते.


दोषींना शिक्षा झालीच पाहिजे : गृहमंत्री
बनावट चकमक प्रकरणात दोषी असलेल्यांना शिक्षा झालीच पाहिजे, असे वक्तव्य गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी केले. गुप्तहेर विभागातील अधिका-यांचा या प्रकरणात सहभाग असल्याचे सीबीआयने अहमदाबाद न्यायालयात नमूद केले आहे. त्या पार्श्वभूमीवर शिंदे यांनी हे वक्तव्य केले.