आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Congress Candidate From JK Fill Girl's Marriage Information In Liability Column

राजकीय नेत्याच्या लेखी मुलीचे लग्न ‘लोढणे’, उमेदवारी अर्जात ‘लायबिलिटी’ म्हणून नोंद

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
फोटो - महंमद यूसुफ भट
श्रीनगर - जम्मू-काश्मीरमधील काँग्रेस उमेदवार महंमद युसूफ भट यांच्या लेखी मुलींचे लग्न हे ‘आर्थिक लोढणे’ आहे. उमेदवारी अर्जासोबत दिलेल्या शपथपत्रातच तशी त्यांनी नोंद केली आहे. भट यांच्या या नोंदीमुळे मुलींकडे पाहण्याचा समाजाचा दृष्टिकोन अद्यापही बदललेला नाही, हेच पुन्हा एकदा स्पष्ट झाले आहे.

भट यांनी ‘देणेदारी’च्या कॉलममध्ये मुलीच्या लग्नाचा उल्लेख केला आहे. खरे तर इंग्रजीतील ‘ लायबिलिटी’ या शब्दाचा अर्थ त्यांनी ‘जबाबदारी’ असा घेतला आणि या शपथपत्रातील या कॉलममध्ये त्यांनी ‘अविवाहित मुलीचे लग्न’ अशी नोंद करून टाकली. महंमद युसूफ भट यांनी गांदरबल मतदारसंघातून उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. ते नॅशनल कॉन्फरन्स सोडून काँग्रेसमध्ये दाखल झाले आहेत. हे प्रकरण उघडकीस आल्यानंतर त्यांचा उमेदवारी अर्ज रद्द करण्याच्या मागणीने जोर धरला आहे.

आर्थिक नियोजनातही मुलगी ‘लायबिलिटी’च : देशातील कोणतेही आर्थिक नियोजक एखाद्याचे आर्थिक नियोजन करताना त्याचे अपत्य ‘लायबिलिटी’च मानूनच नियोजन करतात. अर्थ संगोपन,शिक्षण आणि विवाहासाठी लागणारा अंदाजे खर्च या नियोजनात गृहीत धरला जातो. मुलगी हे ‘आर्थिक लोढणे’ मात्र समजले जात नाही.
त्यात गैर काय?
मुलीचे लग्न लावून देणे ही पित्याची जबाबदारीच असते. ते कोणत्याही प्रकारचे ओझे नसते. मुलीच्या उत्पन्नाचे कोणतेही साधन नसल्यामुळे मी तसे लिहिले असले तरीही त्यात चुकीचे काहीच नाही. - महंमद युसूफ भट, काँग्रेस उमेदवार