आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पंजाबमध्ये कॅप्टन ठरला काँग्रेस; विजयाचा जल्लोष,अमरिंदर सिंगांना जनतेने दिले बर्थ डे गिफ्ट

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
चंडीगड- शिरोमणी अकाली दलाच्या राजनीतीला कंटाळलेल्या पंजाबच्या जनतेने काँग्रेसच्या बाजुने कौल दिला आहे. पंजाबमध्ये काँग्रेस सर्वात मोठा पक्ष म्हणून समोर आला आहे. चंडीगढ काँग्रेस कार्यालयाबाहेर कार्यकर्त्यांनी मोठी गर्दी केली आहे. ढोल-ताशाच्या गजरात कार्यकर्त्यानी जल्लोष सुरु केला आहे.

दुसरीकडे, पतियाळा येथे कॅप्टन अमरिंदर सिंग यांच्या निवासस्थानाबाहेरही काँॅग्रेस कार्यकर्ते जल्लोष करत आहे.

अमरिंदर सिंगांना जनतेने दिले बर्थ डे गिफ्ट
- कॅप्टन अमरिंदर सिंग यांचा आज (शनिवारी) वाढदिवस आहे. जनतेने काँग्रेसने बहुमत देऊन वाढदिवशी मोठे गिफ्ट दिले आहे.
- पतियाळा येथे  अमरिंदर सिंग यांच्या घराबाहेर लाडू वाटप केले जात आहे. आतशबाजी केली जात अाहे.
- कॅप्टन अमरिंदर यांनी राज्यातील पतियाळा आणि लंबी, अशा दोन विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवली होती. अमरिंदर यांना  पतियाळामधून विजय मिळाला तर लंबी येथे पराभवाचा सामना करावा लागला. मुख्यमंत्री प्रकाशसिंग बादल लंबीमधून विजयी झाले आहेत.

पंजाबधील काँग्रेसच्या विजयाचा जल्लोषाचे फोटोज आणि व्हिडिओ पाहाण्यासाठी पुढील स्लाइड्सवर क्लिक करा...
(छायाचित्रकार: अजय शर्मा)


(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
 
बातम्या आणखी आहेत...