आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मोदींनीच नेत्यांना दिली वादग्रस्त वक्तव्यांची सूट, सोनिया गांधींचा हल्ला

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
संमेलनात बोलताना सोनिया गांधी. - Divya Marathi
संमेलनात बोलताना सोनिया गांधी.
नवी दिल्ली - काँग्रेसच्या मुख्यमंत्र्यांचे संमेलन दिल्लीमध्ये सुरू झाले आहे. यावेळी काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी नरेंद्र मोदींवर हल्ला चढवला. भाजप नेत्यांकडून वारंवार दिल्या जाणाऱ्या वादग्रस्त वक्तव्यांवरही त्यांनी टीका केली. सुशासनाचा दावा करणऱ्या मोदींनीच त्यांच्या नेत्यांना धार्मिक तेढ पसरवणारी, धार्मिक वक्तव्ये करण्याची सूट दिली असल्याचे सोनिया म्हणाल्या.

मोदी सरकारला विरोध सुरुच राहणार
सुत्रांच्या माहितीनुसार काँग्रेसच्या मुख्यमंत्र्यांच्या संमेलनात मोदी सरकारच्या अपयशांना सर्वांसमोर आणून सरकारच्या विरोधातील लढाई पुढे नेण्याची रणनीती आखण्यात येत आहे. संमेलनाच्या अध्यक्षा सोनिया गांधींनीही सरकारवर जोरदार हल्ला चढवला आहे. सोनिया म्हणाल्या की, मोदींच्या राज्यात सत्तेते केंद्रीकरण, संसदेचे अवमूल्यन, नागरिकांना किंवा विशिष्ट समाजाला धमक्या आणि न्यायपालिकेला चेतापणी असे अभूतपूर्व काम सुरू आहे. 56 दिवसांंच्या सुट्यांनंतर एका वेगळ्या उर्जेने कामाची सुरुवात करणारे राहुल गांधीही सरकारवर पुन्हा हल्ला करतील अशी शक्यता आहे. ते शेतकऱ्यांचा मुद्दा मांडणार असल्याची शक्यता आहे.

दोन वर्षांनी काँग्रेस मुख्यमंत्र्यांचे संमेलन
जानेवारी 2013 मध्ये जयपूरमध्ये आयोजित 'चिंतन शिबिरात’ राहुल गांधींना पक्षाचे उपाध्यक्षपद दिल्यानंतर होणारे हे मुख्यमंत्र्यांचे पहिलेच संमेलन आहे. या संमेलनात सोनिया गांधींशिवाय माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांचाही मुख्य वक्त्यांमध्ये समावेश आहे. काँग्रेसची नऊ राज्यांमध्ये सत्ता आहे त्यात अरुणाचल प्रदेश, मेघालय, आसाम, मिझोरम, मणिपूर, कर्नाटक, केरळ, उत्तराखंड आणि हिमाचल प्रदेशचा समावेश आहे.
पुढील स्लाइड्सवर पाहा PHOTOS
बातम्या आणखी आहेत...