आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राहुल गांधींनी घेतली चिनी राजदुतांची भेट, दुतावासाच्या वेबसाइटवरुन भेटीचे वृत्त गायब

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधींनी चीनी राजदुतांची भेट घेतली आहे. यावरुन उलट-सुलट चर्चा सुरु झाली आहे. सोमवारी काँग्रेसने प्रथम या भेटीचा इन्कार केला मात्र नतंर जेव्हा या भेटीला प्रसिद्धी मिळायला लागली त्यानंतर काँग्रेसने भेटीच्या वृत्त खरे असल्याचे म्हटले आहे. त्यासोबतच त्याला एवढे महत्त्व देण्याची गरज नसल्याचे म्हटेल आहे. चीनी दुतावासानेही आधी या भेटीला आपल्या वेबसाइटवर दुजोरा दिला मात्र नंतर हा मजकूर वेबसाइटवरुन हटवण्यात आला. काँग्रेसने म्हटले आहे, की काँग्रेस अध्यक्ष आणि उपाध्यक्ष वेळोवेळी अनेक राजदुतांना भेटत असतात. त्याला एवढे महत्त्व देण्याची गरज नाही. 
 
काय आहे प्रकरण 
- भारत आणि चीन दरम्यान सिक्कीम सीमेवर तणाव निर्माण झाला आहे. चीनला भूतानला जोडणाऱ्या भागात रस्ता निर्माण करण्याची इच्छा आहे. भारत आणि भूतानने याला विरोध केला आहे. एक महिन्यापासून या मुद्द्यावरुन या दोन्ही देशांचे सैनिक आमने-सामने येत आहेत. चीनला ठोस प्रत्युत्तर देण्यासाठी भारतीय सैनिकांनी काही दिवसांपासून येथे तंबू ठोकले आहेत. 
- हा मुद्दा चर्चेने सोडवण्याचे प्रयत्न भारताकडून सुरु आहेत. याच दरम्यान काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी 8 जुलै रोजी याच मुद्द्यावरुन चीनचे भारतातील राजदूत लू झाओहुई यांची भेट घेतली. 
 
भाजपची काय आहे भूमिका 
- भाजपचे प्रवक्ते जीव्हीएल नरसिम्हाराव म्हणाले, सरकार हा प्रश्न डिप्लोमॅटिक लेव्हलवर सोडवण्याचे प्रयत्न करीत आहे. राहुल गांधी यांना आऊट ऑफ टर्न जाऊन काम करण्याची सवय आहे. त्यांनी फक्त एवढेच सांगावे की त्यांनी भेट घेतली होती किंवा नाही? दुसरीकडे, भाजपचे एक नेते गौरव भाटिया म्हणाले, सर्वच पक्षांनी सरकारला साथ दिली पाहिजे. 
बातम्या आणखी आहेत...