आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
इटावा - समाजवादी पार्टीचे प्रमुख मुलायमसिंह यादव यांचा काँग्रेसविरोध दिवसेंदिवस वाढतच आहे. आता त्यांनी काँग्रेस पक्षाला विश्वासघातकी ठरवले आहे. सत्ता मिळवण्यासाठी हा पक्ष काही वस्तू स्वस्त करतो आणि निवडणुका जिंकल्या की दिलेली आश्वासने विसरतो, असे मुलायम यांनी म्हटले आहे. सैफेइ येथील होळी महोत्सवात ते बोलत होते.
आगामी लोकसभा निवडणुकीतील आपले महत्त्व अधोरेखित करताना मुलायम म्हणाले की, पुढील निवडणुकीत ना काँग्रेसचे सरकार येईल, ना भाजपचे. मोदींवर टीका करताना ते म्हणाले की, मोदींनी कोणतेही विशेष काम केलेले नाही. लोक नाहक मोदी-मोदी अशी ओरड करत आहेत. परंतु पुढील निवडणूका बरेच काही ठरवणा-या आहेत. त्यामुळे कार्यकर्त्यांनी कामाला लागावे, असे आवाहन मुलायम यांनी केले.
केंद्रीय मंत्री बेनीप्रसाद वर्मा यांनी मुलायम यांच्याविषयी गुंड आणि अतिरेक्यांशी संबंध ठेवणारे अशी विधाने केली होती. तेव्हापासून मुलायम यांचा काँग्रेसशी दुरावा वाढतो आहे. सीबीआयमार्फतआपल्या सहका-यांना त्रास दिला जात असल्याचा आरोपही त्यांनी काँग्रेसवर केला.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.