आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Congress Leader Bhanwar Lal Says MD Of Circus To Rahul Gandhi EdX

राहुल गांधींचे प्रमोशन, नेत्यांनी जोकर नंतर आता बनवले काँग्रेस सर्कसचे एमडी

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जयपूर - केरळच्या एका काँग्रेस नेत्याने नुकतेच राहुल गांधी यांना जोकर म्हटले होते. मात्र सरदारशहर (चुरू) येथील काँग्रेस आमदार आणि माजी मंत्री भंवरलाल शर्मा यांनी, काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांना काँग्रेस नावाच्या सर्कसचे मॅनेजिंग डायरेक्टर (एमडी) म्हटले आहे. तर त्यांना सल्ला देणारे त्यांचे नीकटवर्तीय नेते हे जोकर असल्याचे शर्मा म्हणाले आहेत.
लोकसभा निवडणुकीत झालेल्या पराभवाच्या पार्श्वभूमीवर शुक्रवारी जयपूरमध्ये फीडबॅक बैठक बोलावण्यात आली होती. त्यावेळी चुरू येथील काँग्रेस उमेदवार प्रताप पुनियां यांच्या आरोपांना प्रत्युत्तर देताना शर्मा यांनी ही टिपण्णी केली आहे. पुनिया यांनी बैठकीमध्ये भंवरलाल शर्मा, चंद्रशेखर वैद्य, भंवरलाल मेघवाल आणि मकबूल मंडेलिया हे आपल्या पराभवासाठी जबाबदार असल्याचे म्हटले होते. त्याला उत्तर देताना भवरलाल यांनी ही टीका केली होती.

नंतर दिलेल्या प्रतिक्रियेमध्ये भवरलाल म्हणाले की, आमच्या मदतीशिवाय त्यांना एक लाख 75 हजार मते कशी मिळाली, हे पुनियांना विचारले पाहिजे असेही ते म्हणाले. त्यांची 20 हजार मते मिळवण्याची लायकी नाही. तरीही त्यांना आमच्यामुळेच एवढी मते मिळाली, अशा शब्दांत काँग्रेसमधील अंतर्गत कलह सर्वांसमोर येऊ लागले आहेत. फीडबॅक बैठकीत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष सचिन पायलट, प्रदेश प्रभारी गुरदास कामत, सहप्रभारी मिर्जा इरशाद बेग आणि विरोधीपक्ष नेते रामेश्वर डुडी उपस्थित होते.

पुढे वाचा - कोण आहेत भवरलाल आणि सीपी जोशींबाबत त्यांचे मत...

फोटो - शुक्रवारी झालेल्या बैठकीला उपस्थित राज्याचे प्रभारी गुरुदास कामत व सचिन पायलट.
कोण आहेत भवरलाल शर्मा