आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Congress Leader Family Bhupati House Amethi Dispute Firing Latest News

अमेठी राजघराण्यातील वाद : गोळीबारात एका पोलिसाचा मृत्यू, पत्रकारांवरही लाठीचार्ज

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
लखनऊ - अमेठीच्या 'भूपती भवन'चे वारसदार व काँग्रेसचे खासदार संजय सिंह आणि त्यांची पत्नी गरिमा सिंह यांच्यात वारसा हक्कावरुन सुरु असलेला वाद आता रक्तरंजित संघर्षात बदलताना दिसत आहे. संजय सिंह आणि त्यांची पत्नी अमिता रविवारी लखनऊहून अमेठीला रवाना झाले. त्यांना सोमवारी कोर्टात हजर राहायचे आहे. त्याआधी तेथील ग्रामस्थांनी भूपती भवनाला घेराव घातला आहे. अमिता यांना भवनमध्ये घुसू देणार नाही, असा पवित्रा ग्रामस्थांनी घेतला आहे.

भूपती भवनला घेराव घालणार्‍या संतप्त ग्रामस्थांना पांगवण्यासाठी पोलिसांनी हवेत फायरिंग केले तर, त्याला गावकर्‍यांनीही गोळीबार आणि दगडफेक करुन प्रत्युत्तर दिले. यात एका पोलिस कर्मचार्‍याला गोळी लागली. त्यांचा हॉस्पिटलमध्ये नेत असताना मृत्यू झाला आहे. यासोबतच अनेक गावकरी देखील जखमी झाले आहेत. घटनास्थळी पोलिसांची मोठी कुमक बोलावण्यात आली असून आरएएफ देखील तैनात करण्यात आले आहेत. भूपती भवनबाहेर सुरु असलेला हिंसाचर कव्हर करत असलेल्या माध्यमकर्मींवर पोलिसांनी लाठीचार्ज केला आहे. यात एक टीव्ही पत्रकार जखमी झाला असून त्याला हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे.
काय आहे प्रकरण
भूपती भवनच्या मालकी हक्कावरुन राजकीय नेते संजय सिंह आणि त्यांची पहिली पत्नी गरिमा यांचा मुलगा अनंत विक्रमसिंह एकमेकांसोर उभे ठाकले आहेत. कित्येक वर्षांपासून सुरु असलेल्या वादानंतर 25 जुलै रोजी गरिमा सिंह या कुटुंबासह येथे परत आल्या. त्यांनी त्यांचे आणि त्यांच्या मुलांचे कुटुंबाच्या रजिस्टरमध्ये नाव नोंदविण्यासाठी प्रशासनाकडे अर्ज केला होता. त्यावर संजयसिंह यांनी आक्षेप घेतला होता. त्यामुळे हे प्रकरण ग्राम पंचायतीकडे गेले होते. गेल्या शुक्रवारी होणारी पंचायतीची बैठक पुढे ढकलण्यात आली होती. सोमवारी संजयसिंह आणि त्यांची दुसरी पत्नी अमिता यांना कोर्टात हजर व्हायचे आहे. त्याआधीच अनंत विक्रमसिंह यांच्या समर्थनार्थ ग्रामस्थांनी अमिता यांना भूपती भवनमध्ये प्रवेश करु देणार नाही असे म्हणत भवनला घेराव घातला.
राणी गरिमा सिंह यांचा मुलागा अनंत विक्रमसिंहचे म्हणणे आहे, की त्याचे वडील संजयसिंह यांना कुटुंबाच्या रजिस्टरमध्ये त्याची आई गरिमा यांचे नाव नको आहे. त्यांनी रजिस्टरमधून गरिमा यांचे नाव हटवून तिथे अमिता सिंह यांचे नाव टाकले आहे. कुटुंबाच्या रजिस्टरमध्ये आपले नाव परत समाविष्ट करावे यासाठी त्यांनी प्रशासनाकडे अर्ज केला होता.

(छायाचित्र - भूपती भवनाला घेराव घातलेले ग्रामस्थ )

पुढील स्लाइडमध्ये पाहा, घटनास्थळाचे दृष्य