आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पंजाब इलेक्शन : सत्ता आल्यास 4 आठवड्यांत पंजाब ड्रग्जमुक्त करू, काँग्रेसचे आश्वासन

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - पंजाब निवडणुकांसाठी डॉ. मनमोहन सिंग यांनी काँग्रेसचा जाहीरनामा सादर केला. यात सत्ता आल्यास चार आठवड्यांत पंजाब ड्रग्जमुक्त करण्याची घोषणा करण्यात आली. यावेळी दिल्लीत कार्यक्रमाला पंजाब कांग्रेसचे प्रमुख अमरिंदर सिंग आणि मॅनिफेस्टो ड्राफ्टींग पॅनलचे चेअरपर्सन रजिंदर भट्टलही उपस्थित होते. 

4 आठवड्यांत ड्रग्सची समस्या सोडवणार.. 
- काँग्रेसने त्यांच्या मॅनिफेस्टोत अनेक आश्वासने दिली आहेत. 
- पार्टीच्या मते पंजाबमध्ये जर काँग्रेसची सत्ता आली तर बेघरांना घरे दिली जातील. 
- चार आठवड्यांत राज्यातील ड्रग्सची समस्या दूर केली जाईल. 
- शेतकऱ्यांची थकबाकी, कर्ज माफ केले जाईल. 
- मुलींना पीएचडीपर्यंत मोफत शिक्षण दिले जाईल. 
- पंजाबची गरज भागल्यानंतरच येथील पाणी इतर राज्यांना दिले जाईल. 
- बिझनेस आणि इंडस्ट्रीजसठी 5 रुपये युनिच दराने वीज देणार. 
- तरुणांना दर महिन्याला 2500 रुपये बोरोजगारी भत्ता मिळेल. 
- प्रत्येक घराला रोजगार उपलब्ध करून दिला जाईल. 

अकाली सरकारवर हल्ला 
- यावेळी मनमोहन सिंग म्हणाले, गेल्या दहा वर्षात सरकारनेच पंजाबचा विकास अडवून धरला आहे. 
- कॅप्टन अमरिंदर सिंग यांच्या नेतृत्त्वात पंजाबचा विकास होईल. त्यांना मोठा अनुभव आहे. 
- आम्ही पंजाबमध्ये इन्फ्रास्ट्रक्चर, अॅग्रिकल्चर अधिक चांगले बनवण्यासाठी काम करू. अकाली सरकारने याकडे दुर्लक्ष केले. 

सिद्धू काँग्रेस प्रवेश करण्याची शक्यता 
- बाजप सोडून आवाज-ए-पंजाब पार्टी स्थापन करणारे सिद्धी एक दोन दिवसांत काँग्रेसमध्ये प्रवेश करू शकतात. 
- ते अमृतसर (ईस्ट) मधून विधानसभा निवडणूक लढवणार असल्याची शक्यता आहे. सध्या याठिकाणी सिद्धू यांची पत्नी 
नवज्योत कौर आमदार आहे. 
- सुत्रांच्या मते 11 जानेवारीला होणाऱ्या राष्ट्रीय सम्मेलनात सिद्धू काँग्रेसमध्ये प्रवेश करू शकतात. 
 
पुढे पाहा, संबंधित PHOTOS
 
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
 
 
बातम्या आणखी आहेत...