आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Congress Might Face Huge Loss In UP, Rahul Presses The Panick Button

महाराष्ट्रासह गांधी घराण्याच्या किल्ल्याला खिंडार- काँग्रेसचे सर्वेक्षण

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली - देशातील सर्वात जास्त लोकसभा सदस्य (80) असलेल्या उत्तरप्रदेशमध्ये काँग्रेसची स्थिती दयनिय झाली आहे. याची जाणीव काँग्रेसला झाली आहे. पक्षाचे महासचिव आणि उत्तरप्रदेश प्रभारी मधुसूदन मिस्त्री यांनी केलेल्या एका सर्व्हेक्षणात उत्तरप्रदेशात काँग्रेसला आहे त्या जागा राखणे अवघड होणार असल्याचे निष्कर्ष समोर आले आहेत. 2009 मध्ये येथे काँग्रेसला 22 जागामिळाल्या होत्या. मिस्त्री यांच्या सर्व्हेक्षणानुसार आगामी निवडणूकीत काँग्रेस आर्ध्यावर येईल अशी शक्यता वर्तवण्यात आली आहे. मिस्त्री यांनी सोमवारी (22 जुलै) पक्षाचे उपाध्यक्ष खासदार राहुल गांधी यांना या सर्व्हेक्षणाचा अहवाल दिला आहे.

सुत्रांच्या माहितीनुसार या अहवालात काँग्रेसविरोधी वारे उत्तरप्रदेशात वाहात असल्याचे नमुद करण्यात आले आहे. केंद्रातील सहा मंत्र्यांचे राज्याकडे झालेले दुर्लक्ष्य त्याला कारणीभूत असल्याचे त्यात म्हटले आहे. मिस्त्री यांच्या अहवालानुसार बेनी प्रसाद वर्मा, सलमान खुर्शीद, प्रकाश जैस्वाल हे तीन कॅबिनेट मंत्री आणि आर.पी.एन. सिंह, जतिन प्रसाद आणि प्रदीप जैन हे तीन केंद्रीय राज्यमंत्री लोकांच्या तक्रारीकडे लक्ष देत नाहीत किंवा त्यांचे ऐकून घेत नाही.

पुढील स्लाइडमध्ये, महाराष्ट्रातही काँग्रेसला घसरण