आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Congress Minister In Jharkhand Gave Controversial Statement

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

सोनिया-राहुल गांधींकडे चकरा मारल्‍यानंतर मिळते पद- मंत्र्याची मुक्ताफळे

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

रांची- झारखंडमध्‍ये मुख्‍यमंत्री हेमंत सोरेन यांच्‍या मंत्रिमंडळाच्‍या विस्‍तारानंतर एका मंत्र्याने खळबळजनक खुलासा केला आहे. या मंत्र्याच्‍या बडबोल्‍या वक्तव्‍यावरुन कॉंग्रेसला बॅकफुटवर येऊन सारवासारव करावी लागत आहे. कॉंग्रेसच्‍या अध्‍यक्ष सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांच्‍याकडे चकरा मारल्‍यानंतरच मंत्रिपद मिळते, असे कॅबिनेटमध्‍ये स्‍थान मिळालेले कॉंग्रेसचे योगेंद्र साहू यांनी सांगितले. झारखंडमध्‍ये जेएमएम आणि कॉंग्रेस यांचे आघाडीचे सरकार काही महिन्‍यांपूर्वीच स्‍थापन झाले आहे.

योगेंद्र साहू यांनी एका कार्यक्रमादरम्‍यान मंत्री कसे बनलो, याची रसभरीत कहाणी ऐकविली. ते म्‍हणाले, मंत्री बनण्‍यासाठी सोनियांसह राहूल गांधी तसेच अहमद पटेल यांच्‍याकडे चकरा माराव्‍या लागल्‍या. एवढेच नव्‍हे तर दुर्गा पाठ आणि जोडे शिवण्‍यापासून अनेक गोष्‍टी कराव्‍या लागल्‍या. तेव्‍हा कुठे मंत्री बनलो. साहू यांच्‍या या वक्तव्‍यानंतर कॉंग्रेसमध्‍ये खळबळ उडाली आहे

झारखंडमध्‍ये तीन दिवसांपूर्वी मंत्रिमंडळाचा विस्‍तार करण्‍यात आला होता. साहू यांना कृषिमंत्रीपद देण्‍यात आले आहे. मंत्रीपदाचा कार्यभार स्विकारल्‍यानंतर साहू यांनी एका कार्यक्रमात मुक्ताफळे उधळली. मंत्रिपदाच्‍या यादीत आपले नाव नव्‍हते. परंतु, 15 दिवस चकरा मारल्‍यानंतर मंत्रिपद मिळाले, असेही साहू म्‍हणाले.

पुढील स्‍लाईडवर क्लिक करा आणि वाचा साहू यांनी उधळलेली मुक्ताफळे...