आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

'मातांच्या नशापानामुळे वाढत आहे कुपोषण', काँग्रेसच्या मंत्र्यांचे वादग्रस्त वक्तव्य

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बॉलिवूड अभिनेता अमिर खान सध्या देशातील माता आणि नवजात बालकांच्या काळजीचे धडे टीव्ही आणि रेडिओवरून देत आहे. देशातून कुपोषणाला घालवण्यासाठी आरोग्य विभाग सर्व आघाड्यांवर प्रयत्न करीत आहे. असे असतानच केरळचे सांस्कृतिक मंत्री के.सी.जोसेफ यांनी वादग्रस्त वक्तव्य केले आहे.

केरळमधील अट्टापडी येथील बालकांमधील वाढत्या कुपोषोणला मातांचे मद्यपान कारणीभूत असल्याचा अजब शोध जोसेफ यांनी लावला आहे. जोसेफ यांच्या मते अट्टापडी येथील स्त्रिया या दिवसभर नशेत असतात त्यामुळे तेथील बालकांचे मृत्यूचे प्रमाण आणि त्यांच्यातील कुपोषण वाढले आहे.

काँग्रेसचे मंत्री असलेल्या जोसेफ यांनी हे वादग्रस्त वक्तव्य कन्नूर येथील सभेत केले आहे. कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडिया मार्क्सवादीचे ज्येष्ठ नेते आणि राज्यातील विरोधीपक्ष नेते व्ही.एस. अच्यूतानंदन यांनी जोसेफ यांच्या वक्तव्याचा समाचार घेतला आहे. राज्य सरकार कुपोषीत बालकांसाठी प्रभावी उपाययोजना राबवण्याऐवजी अशा प्रकारे त्यांच्या भावनांशी खेळत असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. जोसेफ यांचे वक्तव्य आदिवासी स्त्रियांचा अवमान करणारे असल्याचे त्यांनी म्हटले आहे.