आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कॉंग्रेसच्या महिला आमदाराला अटक, 4552 कार चोरणार्‍या आरोपीसोबत रुमी नाथचे साटेलोटे

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(फाइल फोटोः ' फेसबुक पेज'वरील कॉंग्रेसच्या आमदार रूमी नाथ यांचे छायचित्र)
गुवाहाटी- बोरखोलाच्या कॉंग्रेसच्या आमदार रूमी नाथ यांना आसाम पोलिसांनी आज (मंगळवारी) अटक केली. देशातील विविध भागातल्या सुमारे 4552 कार चोरणारा आरोपी अनिल चौहान यांच्यासोबत त्यांचे साटेलोटे सल्याचा रूमी नाथ यांच्यावर ठपका ठेवण्यात आला आहे. आरोपी अनिल चौहानला पोलिसांनी 6 एप्रिलला गुवाहाटीत अटक केले होते. चौकशीत रूमी नाथ यांचे नाव उघडकीस आले होते.
आरोपी अनिल याच्या संपर्कात असणार्‍या रूमी नाथ यांना आसाम विधानसभा अध्यक्ष प्रणब गोगोई यांनी यापूर्वी स्पष्टीकरण मागितले होते. आमदार रूमी नाथ यांनी अनेकदा आरोपी अनिलला विधानसभेचा पास मिळवून दिला होता. तसेच रूमी नाथ यांनी आरोपीकडून चोरीचा कार खरेदी केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.
एमएलए हॉस्टेल येथून मंगळवारी सकाळी सात वाजता आमदार रूमी नाथ यांना अटक करण्‍यात आले. दीसपूर पोलिसांनी ही कारवाई केली. रूमी यांच्याविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यांना लवकरच कोर्टात हजर केले जाणार असल्याचे, पोलिस उपायुक्त लाल बरुआ यांनी सांगितले.
'याप्रकरणी मी यापूर्वीच स्पष्टीकरण दिले आहे. पोलिस त्यांचे काम करत आहे. न्यायदेवतेवर माझा पूर्ण विश्वास आहे.'
- आमदार रुमी नाथ

चोरीची कार पतीला भेट दिल्याचा आरोप...
कार चोरटा अनिल चौहान आणि आमदार रुमी नाथ यांनी मागील अनेक वर्षांपासून ओखळ आहे. रूमी नाथ यांनी पतीला एक महागडी कार भेट दिली होती. ही कार अनिलकडून खरेदी करण्‍यात आली होती. विशेष म्हणजे ती चोरीची होती, असे सूत्रांनी सांगितले.
दुसरीकडे, रुमी नाथ यांच्या‍ शिफारसीने 2013 पासून आरोपी अनिलने तिनदा विधानसभेचा पास मिळवला होता. रूमी नाथ यांनी सुरवातीला आरोपी अनिलला कार चालक सांगितले होते.

पुढील स्लाइडवर क्लिक करुन वाचा, अनेकदा चर्चेत आल्या आहेत आमदार रूमी नाथ...