आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Congress MP Birender Singh, Meets Amit Shah, May Be Next To Go

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

हरियाणामध्ये कॉंग्रेसला दूसरा झटका, आणखी एक खासदार भाजपच्या वाटेवर

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली/चंडीगड- हरियाणात कॉंग्रेसला दुसरा झटका बसला आहे. राज्याचे ऊर्जा मंत्री अजयसिंह यादव यांनी राजीनामा दिल्यानंतर कॉंग्रेसचे खासदार बीरेंद्र सिंह भाजपच्या वाटेवर आहे. लोकसभा निवडणुकीत कॉग्रेसला मोठा पराभव स्विकारावा लागला होता. या पराभवास मुख्यमंत्री हुड्डा जबाबदार असल्याचे अजयसिंह यांनी म्हटले आहे.

खासदार बीरेंद्र सिंह यांनी मंगळवारी रात्री नऊ वाजता दिल्लीत भाजपाध्यक्ष अमित शाह यांची भेट घेतली. जवळपास एक तास दोघांमध्ये चर्चा झाली. यापूर्वी अमित शाह यांनी पक्षातील ज्येष्ठ नेत्यांशी चर्च करून बिजेंद्र सिंह यांना ग्रीन सिग्नल दिला होता. या पार्श्वभूमीवर बीरेंद्र सिंह यांनी अमित शाह यांचे आभार मानले आहे. आपल्या समर्थकांसह भाजपमध्ये प्रवेश करण्याची इच्छा दर्शवली आहे.

दिल्लीतील गुजरात भवनात बीरेंद्र सिंह यांनी शाह यांची भेट घेतली. प्रदेश भाजपचे सहप्रभारी अनिल जैन यांच्यासोबत बीरेंद्र सिंह गुजरात भवनात पोहोचले होते. अमित शाह यांनी बीरेंद्र सिंह यांच्यासोबत चर्चा केली. सिंह यांच्या भाजप प्रवेशास कोणताही अडथळा नसल्याचे सांगितले. बीरेंद्र सिंह लवकरच भाजपचे सदस्यत्त्व स्विकारणार आहे.

दरम्यान, कॉंग्रेसचे राज्यसभेचे खासदार बीरेंद्र सिंह यांनी मुख्यमंत्री हुड्डा यांच्या नेतृत्त्वात विधानसभा निवडणूक लढण्यास स्पष्‍ट नकार दिला आहे. मुख्यमंत्री यांचा पायउतार केला नाही तर पक्षाला सोडचिठ्ठी देण्याचा इशारा बीरेंद्र सिंह यांनी यापूर्वीच दिला होता. बीरेंद्र सिंह यांनी याबाबत गेल्या महिन्यात कॉंग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांची भेट घेतली होती. मात्र, हायकमांडने सिंह यांच्याकडे दुर्लक्ष केले. दुसरीकडे बीरेंद्र सिंह यांचे निकटवर्तीय धर्मपाल शर्मा यांनी देखील कॉंग्रेसला सोडसिठ्ठी देण्याची घोषणा केली आहे.

पुढील स्लाइड्‍सवर वाचा, मुख्यमंत्री भुपेंद्र हुड्डा अडचणीत...
(फोटोः भाजपचे राष्ट्रीय अध्‍यक्ष अमित शाह यांच्यासोबत कॉंग्रेसचे खासदार बीरेंद्र सिंह)