आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Congress News In Marathi, Tamil Nadu, Anna Dramuk, Chennai, Lok Sabha Election

लोकसभा निवडणुकीत तामिळनाडूत काँग्रेस एकाकी; अण्णाद्रमुक, द्रमुककडून थारा नाही

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

चेन्नई - श्रीलंकेतील तामिळींचा मुद्दा आणि राज्यातील मच्छीमारांवरील हल्ल्याच्या पाश्र्वभूमीवर 24 एप्रिल रोजी होऊ घातलेल्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेस पक्ष एकाकी पडला आहे. सत्ताधारी अण्णाद्रमुक व मुख्य विरोधी पक्ष द्रमुकने आपापली रणनीती निश्चित केल्यामुळे काँग्रेस स्वबळावर निवडणूक लढत आहे.


भाजपजवळ जाणा-या डीएमडीके पक्षाला द्रमुकने आघाडीत घेतले नाही. अण्णाद्रमुक आणि द्रमुकच्या आघाडीत स्थान मिळू न शकल्यामुळे काँग्रेसची अवस्था 1998 सारखी झाली आहे. त्या निवडणुकीत काँग्रेसच्या पदरी निराशा आली होती. संपुआ सरकारवर भ्रष्टाचाराचे आरोप झाल्यामुळे काँग्रेसची प्रतिमा डागाळली आहे. त्यात राजीव गांधी यांच्या सात मारेक-यांच्या सुटकेला विरोध करण्याच्या भूमिकेमुळे काँग्रेसला जनाधार प्राप्त करणे कठीण बनले आहे. पंतप्रधान मनमोहनसिंग आणि श्रीलंकेचे राष्टÑाध्यक्ष महिंदा राजपक्षे यांच्यात म्यानमारमधील परिषदेदरम्यान झालेल्या भेटीवर द्रमुक आणि तामिळ गटांनी विरोध दश्रवला होता. काँग्रेसला या मुद्द्यावरही स्पष्टीकरण देण्यास नाकीनऊ आले.