आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Congress President Sonia Gandhi Organised Iftar Party In Delhi

इफ्तार पार्टीत मनमोहन सिंग नेत्यांपासून दूरच, राहुल गांधींनी ऐकवले जोक्स

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
फोटो : कांग्रेस अध्‍यक्षा सोनिया गांधीं आणि उपाध्यक्ष राहुल गांधी.

नवी दिल्‍ली - काँग्रेस अध्‍यक्षा सोनिया गांधींनी गेल्या तीन वर्षात प्रथमच इफ्तार पार्टीचे आयोजन केले. साधारणपणे काँग्रेसच्या मुख्यालयात होणारा हा कार्यक्रम यावर्षी एका पंचतारांकित हॉटेलमध्ये झाला. या पार्टीत राजकारणाचे अनेक रंग पाहायला मिळाले. एकिकडे मनमोहनसिंग यांनी नेत्यांशी दुरावा ठेवणे पसंत केले. तर राहुल गांधी पत्रकारांशी जोक शेअर करताना दिसून आले. बिहारमधील काँग्रेस, जेडीयू आणि राजदच्या आघाडीचा प्रभावही दिसून आला. सोनिया, लालूप्रसाद यादव आणि शरद यादव एकाच टेबलवर बसून बराच काळ चर्चा करत होते. डावे मात्र अनुपस्थित होते.

मनमोहन यांचा दुरावा
इफ्तार पार्टीत माजी पंतप्रधान मनमोहनसिंग अराजकीय व्यक्तींबरोबरच अधिक काळ घालवत असल्याचे दिसून आले. एका स्वतंत्र टेबलवर ते माजी मुख्य निवडणूक आयुक्त एसवाय कुरेशी आणि अभिनेत्री शर्मिला टागोर यांच्याबरोबर बसलेले होते. सोनिया मात्र त्यांना वारंवार त्यांच्यासोबत बसायला निमंत्रण देत असल्याचे दिसून आले.

राहुलबाबांचे जोक्स
काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी खूप आनंदी असल्याचे कार्यक्रमात दिसून येत होते. ते माध्यमांच्या प्रतिनिधींबरोबर जोक्स शेअर करत होते. मात्र राजकारणाविषयी काहीही बोलण्यास त्यांनी स्पष्ट नकार दिला.

डाव्यांची अनुपस्थिती
कार्यक्रमात डाव्या पक्षांबरोबर काँग्रेसचा दुरावा वाढत असल्याचे दिसून आले. या पक्षांचा कोणताही नेता सोनियांच्या कार्यक्रमाला उपस्थित नव्हता.

पाहुण्यांची संख्या रोडावली
साधारणपणे सोनियांच्या इफ्तार पार्टीमध्ये नेते मोठ्या संख्येने उपस्थित राहत असतात. पण यावेळी चित्र वेगळे असल्याचे दिसून आले. काँग्रेसचे मुख्यमंत्री उपस्थित नव्हते. तसेच दिल्ली वगळता इतर राज्यांचे प्रदेशात्ध्यक्षही उपस्थित नव्हते. लोकसभेत पक्षाचे नेते मल्लिकार्जुन खरगे, ज्योतिरादित्य सिंधिया, अमरेंद्र सिंह आणि कमलनाथ अशा प्रुमख नेत्यांची अनुपस्थितीही खटकत होती. सुमारे हजार निमंत्रण पत्रिका वाटण्यात आल्या, पण केवळ एक चतुर्थांश लोकच उपस्थित होते, असे सांगण्यात आले.
पुढील स्लाइड्सवर पाहा इफ्तार पार्टीचे फोटो...