जम्मू- कॉंग्रेसच्या अध्यक्षा
सोनिया गांधी यांनी गुरुवारी पंतप्रधान
नरेंद्र मोदी यांच्यावर सडकून टीका केली. नरेंद्र मोदींनी 'अच्छे दिन'च्या नावाखाली जम्मू-काश्मीरमधील जनतेचा विश्वासघात केल्याचा आरोपही सोनियांनी यावेळी केला आहे.
जम्मूमधील मौलाना आझाद स्टेडियमवर सोनिया गांधी यांनी संबोधित केले. कॉंग्रेसच्या उमेदवारांना निवडूण देण्याचे सोनियांनी काश्मीरी जनतेला आवाहन केले. सोनियांना जम्मूमध्ये झेड प्लस सुरक्षा देण्यात आणि. विशेष म्हणजे ठिकठिकाणी कमांडो तैनात करण्यात आले होते.
सोनिया यांना ऐकण्यासाठी काश्मीरी महिलांनी मोठी गर्दी केली होती. सोनियाच्या सभेला महिलांनी थिरकून मोठा उत्साह दाखवला. लोकसभा निवडणुकीच्या काळात भाजप नेत्यांनी काश्मीरी जनतेला लोकहिताची अनेक आश्वासने दिली होती. मात्र, त्यातील एकही आश्वासन अद्याप भाजपने पूर्ण केलेले नसल्याचे सोनियांनी सांगितले.
सोनिया म्हणाल्या, पंतप्रधान मोदी यांनी लोकसभा निवडणुकीच्या काळात जनतेला 'अच्छे दिन' येतील असे स्वप्न दाखवले होते. मात्र, केंद्रात भाजपचे सरकार स्थापन केल्यानंतर सहा महिने उलटले असून मोदी सरकारने जनतेला दिलेले एकही वचन पूर्ण केलेले नाही. त्यामुळे भाजपची 'अच्छे दिन'ची घोषणा निरर्थक ठरल्याचे स्पष्ट झाले आहे.
कॉंग्रेस सरकारच्या कार्यकाळात संशोधित योजनांना मोदी सरकारने मंजुरी दिल्याचा आरोप सोनिया गांधी यांनी यावेळी केला. मोदी सरकारने फक्त उद्योजकांना लाभ मिळवून देण्यात आनंद आहे.
कॉंग्रेसने भ्रष्टाचारावर नियंत्रण मिळवण्यासाठी माहितीचा अधिकार कायदा बनवला होता. मात्र, भाजप सरकारने भ्रष्टाचारात आकंठ बुडालेल्या काही व्यक्तींना वाचवण्यासाठी महितीचा अधिकाराच्या कायद्यात काही बदल करण्याचा सूचना दिल्या आहेत.
साध्वी निरंजन ज्योतींवरही साधला निशाणा...
केंद्रीय मंत्री साध्वी निरंजन ज्योती यांच्या वादग्रस्त वक्तव्यावरही कॉग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी निशाणा साधला. भ्रष्टाचार आणि जातीयवादाला भाजपच खतपाणी घालत असल्याचा घणाघाती आरोपही सोनिया गांधी यांनी केला आहे.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा, सोनिया गांधी यांच्या जम्मूतील सभेचे PHOTO....