आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विधानसभा निवडणुकीत मोदी निशाण्यावर; काँग्रेसच्या प्रचाराची रणनिती

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - एका दिवसात 34 राजीनामे मिळणार्‍या काँग्रेसने चार राज्यांमध्ये आगामी निवडणुकांसाठी रणनिती आखण्यास सुरू केली आहे. काँग्रेसने या निवडणुकीत कडक पाऊले उचलण्याचा निर्णय घेतला आहे. या अंतर्गत काँग्रेस आपल्या प्रचारात अनेक आश्वासनांसोबतच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर हल्लाबोल करण्याच्या विचारात आहे. काँग्रेस प्रचारात मोदींनी लोकसभेत दिलेल्या आश्वासनांवर प्रहार करणार आहे, तसेच महागाईच्या मुद्द्यावर सरकारला धारेवर धरण्याचाही काँग्रेस प्रयत्न करणार आहे.
या प्रचार कार्यक्रमात हरियाणा सरकारने विकासाच्या बाबतील आम्ही गुजरातपेक्षा पुढे असल्याचा दावा केला आहे. तर मागील नऊ वर्षात हुड्डा सरकारने प्रांतासाठी जे काही केले आहे, ते इतर सरकारांना करणे शक्य झाले नाही याबद्दल हरियाणा सरकार माहिती देणार आहे. त्याचबरोबर महाराष्ट्र, जम्मू काश्मीर, झारखंडसाठीही प्रचार कार्यक्रमांची तयारी करण्यात येत आहे. तसेच मोदी सरकारमधील कमतरता याबद्दलचे मुद्दे एकत्रित करण्यात येणार आहे. तर काँग्रेसच्या घोषणांमध्ये मोदींवर हल्लाबोल हा महत्त्वाचा मुद्दा असेल.
महागाईवर स्लोगन तयार करणार
काँग्रेसच्या राजकीय गटाच्या वरिष्ठ नेते म्हणाले की, लोकसभा निवडणुकीदरम्यान मोदींनी महागाईच्या मुद्द्यावर जास्त भर दिला होता. मात्र मोदी सरकारला दोन महिने झाले तरी महागाई कमी करणे शक्य झाले नाही. यामुळे लोकांना महागाईची मोठ्याप्रमाणात झळ सोसावी लागत आहे. पेट्रोल-डिझेलच्या किंमतीत वाढ, रेल्वेभाड्यात वाढ या सर्व मुद्द्यांना लक्षात घेऊन काँग्रेस स्लोगन तयार करत आहे.

मोदींचा खोटा प्रचार उघडकीस आणणार
मोदी सरकारने मागील दोन महिन्यात कोणतेही असे काम केलेले नाही, ज्यामुळे लोक त्यांना पुन्हा मतदान करतील. आम्ही लोकांना जाणीव करून देणार आहोत की, मोदींनी आपल्या घोषणांमधून कशा प्रकारे त्यांची फसवणूक केली ही आमची नैतिक जबाबदारी आहे. या निवडणूकीत मोदींनी केलेला खोटा प्रचार आम्ही उघडकीस आणणार आहोत, अशी माहिती काँग्रेसचे माजी खासदार तसेच महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी दिली.

(फाईल फोटोः काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राहुल गांधी)