आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राहुल गांधी नारळ नव्हे पाइनअॅपल ज्युस म्हणाले होते, मोदी खोटे बोलले : काँग्रेस

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - नरेंद्र मोदी नेहमीच राहुल गांधींच्या भाषणाची खिल्ली उडवत राहतात. बुधवारी युपीच्या महाराजगंजमधील सभेतही तसेच घडले. त्यांनी राहुल गांधींच्या ‘नारळाच्या ज्युस’संदर्भातील वक्तव्याची खिल्ली उडवली. पण काँग्रेसने पंतुप्रधानांवर उलट हल्ला चढवला आहे. राहुल गांधी असे म्हणालेच नाही, असे काँग्रेसचे म्हणणे आहे. राहुल गांधींनी नारळ नव्हे तर पाइनअॅपल ज्युस म्हटल्याचे काँग्रेसने सांगितले. मोदी चुकीची वक्तव्ये करून लोकांशी खोटं बोलत आहेत. काँग्रेसने सत्य सांगण्यासाठी सोशल मीडियावर राहुल गांधींच्या भाषणाचा व्हिडीओदेखिल पोस्ट केला.  

लंडनमध्ये ज्युस प्यावा आणि डब्यावर असावे मेड इन मणिपूर...
मणिपूरमध्ये काय म्हणाले होते राहुल गांधी?
28 फेब्रुवारीला राहुल गांधींनी मणिपूरमध्ये एक सभा घेतली होती. त्यात ते म्हणाले होते, येथील मुख्यमंत्र्यांनी अमेरिकेत जावे, त्याठिकाणी एक शॉल खरेदी करावी आणि त्यावर लिहिलेले असावे मेड इन मणिपूर. त्यासाठी हँडीक्राफ्टचे काम करणाऱ्यांना प्रोत्साहन द्यायला हवे. काँग्रेसने जसे रस्ते बनवले तसे रस्ते बनवावे लागतील. तुम्ही याठिकाणी लिंबू, संत्री, पाइन अॅपलचे उत्पादन घेता. मला वाटते की, कोणी लंडनला जावे आणि त्याठिकाणी पाइनअॅपल ज्युस प्यावा आणि डब्यावर दिसावे मेड इन मणिपूर. 

युपीच्या सभेत काय म्हणाले होते मोदी.. 
- काँग्रेसचे एक नेते म्हणाले होते, की ते आता मणिपूरमध्ये नारळाचा ज्युस काढतील आणि इंग्लंडमध्ये विक्री करतील. अगदी गरीब मुलांनाही माहिती आहे की, नारळाचे पाणी असते ज्युस नवह्ते. त्यात नारळ असतात केरळमध्ये आणि हे म्हणतात मणिपूरमध्ये त्याचा ज्युस काढणार. म्हणाले युपीमध्ये बटाट्याची फॅक्टरी सुरू करणार. बटाटे फॅक्टरीत पिकतात का. आता काँग्रेसकडे एवढे हुशार लोक आहेत की, ते नारळाचा ज्युस इंग्लंडमध्ये विकतील आणि बटाट्याची फॅक्टरी सुरू करतील. पंतप्रधान मोदींनी यावेळी राहुल गांधींचे नाव मात्र घेतले नाही. 

नारळाच्या ज्युसचा मुद्दा आला कसा?
मणिपूरमधील राहुल गांधींच्या सभेनंतर त्याठिकाणच्या काही वृत्तपत्रांनी पाइन अॅपल ज्युसऐवजी नारळ ज्युस असे छापले होते. त्यानंतर ते सोशल मीडियावर व्हायरल झाले. 

काँग्रेसचे म्हणणे काय ?
- काँग्रेस प्रवक्ते रणदीप सुरजेवाला म्हणाले की, मोदींना खिल्ली उडवायला फारच आवडत असेल तर मी सिद्धू यांना सांगून त्यांना कपिलच्या कॉमेडी शोमध्ये साइड रोल मिळवून द्यायला सांगेन. राहुल गांधींबाबतचे ते वक्तव्य चुकीचे असल्याचेही ते म्हणाले. 
- टवीट करून त्यांनी एक व्हिडीओही पोस्ट केला. त्यावर लिहिले मोदीजी थोडे तरी जबाबदारीने वागा. तुमचे खोटेपणाचे हे ज्युससेंटर फार दिवस चालणार नाही. 
 
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.) 
 
बातम्या आणखी आहेत...