आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

काँग्रेसने उत्तर प्रदेशात राहुल गांधी कांदा ५ रुपये किलो दराने विकला

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
लखनऊ - उत्तर प्रदेशात गोरखपूर येथे काँग्रेस कार्यकर्त्यांनी लोकांना स्वस्त कांद्याची विक्री करण्यास सुरुवात केली आहे. 'राहुल गांधी कांदा' नावाने पदाधिका-यांनी पाच रुपये किलो दराने कांदा विक्री सुरू केली आहे. उत्तर प्रदेशात सध्या कांदा ३० ते ४० रुपये किलो दराने विकला जात आहे. त्याचे दर आणखी वाढण्याची शक्यता असून लोकांमध्ये त्याबाबत नाराजी दिसूनयेत आहे. या मुद्याचा राजकीय लाभ उठविण्यासाठी काँग्रेसच्या पदाधिका-यांनी अनोखा फंडा शोधून काढला आहे. काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सय्यद जमाल यांच्या नेतृत्वाखाली कार्यकर्त्यांनी राहुल गांधींची छायाचित्रे असलेले कांद्याचे पॅक विकण्यास सुरुवात केली. त्यांनी लावलेल्या स्टॉलवर जवळपास तीन क्विंटल कांदे तासाभरातच विकले गेले. आम्ही कार्यकर्त्यांच्या मदतीने स्थानिक बाजारातून ठोक भावात कांदे खरेदी केली व ती गोरगरिबांना स्वस्तात वाटली व दरवाढीचा विरोध केला.