आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Congress Suspended Chhattisgarh Former Chief Minister Ajit Jogi Sons For Six Years

घोडेबाजार भोवला: छत्तीसगडमध्ये जोगीपुत्राची काँग्रेसमधून हकालपट्टी

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
रायपूर- छत्तीसगडमध्येबुधवारी प्रदेश काँग्रेसने माजी मुख्यमंत्री अजित जोगी यांच्या मुलगा आमदार अमित जोगी यांची सहा वर्षांसाठी पक्षातून हकालपट्टी केली. तसेच अजित जाेगी यांच्यावरही कारवाईची शिफारस करण्यात आली आहे. अजित जोगी हे अखिल भारतीय काँग्रेस कमेटीचे सदस्य असल्यामुळे त्यांच्यावरील कारवाईचा िनर्णय पक्षश्रेष्ठींच घेतील. सूत्रांनुसार त्यांच्या हकालपट्टीवर पक्ष गुरुवारी िनर्णय घेण्याची शक्यता आहे.

काही दिवसांपूर्वी एक ऑडियो टेप जारी झाली होती. त्यात अमित जोगी छत्तीसगडचे मुख्यमंत्री डॉ. रमणसिंह यांच्या जावयादरम्यान बोलणी सुरू असल्याचे कळते. त्यात जोगी यांनी आपल्यासमोरील उमेदवार हटवण्यासाठी भाजपसोबत आर्थिक व्यवहार केल्याचे संवादातून स्पष्ट होते. त्यानंतर िनवडणुकीत काँग्रेस उमेदवार मंतुराम यांनी त्यांची उमेदवारी अचानक मागे घेतली होती.या निर्णयामुळे काँग्रेसचे मोठे नुकसान झाल्याचे पक्षाला वाटते.

संभाव्य राजकीय घडामोडी
>पक्षातून काढल्यानंतर अजित जाेगी दुसऱ्या पक्षात जाण्याऐवजी स्वत:चा पक्ष काढण्याची शक्यता.
>जोगी पिता - पुत्राला घेण्यासाठी भूपेश बघेल त्यांचे समर्थक सक्रिय. नक्षलवादी हल्ल्याप्रकरणी एनआयए अहवाल जारी करून जोगींच्या अडचणी वाढवण्याची िचन्हे
> काँग्रेस जोगींच्या माध्यमातून रमणसिंह भाजपला घेरणार. रमण यांच्यावर राजीनाम्यासाठी दबाव.