आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अमेठी दौरा : राहुल गाधींनी भेटण्यासाठी महिलेने घातला गोंधळ

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
राहुल गांधींना भेटण्यासाठी गोंधळ घालणारी महिला. - Divya Marathi
राहुल गांधींना भेटण्यासाठी गोंधळ घालणारी महिला.
अमेठी - काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांच्या अमेठी दौऱ्याचा आज दुसरा दिवस आहे. सध्या मुंशीगंज गेस्ट हाऊस येथे राहुल गांधी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी बेट घेत आहेत. दरम्यान यावेळी एका महिलेने राहुल गांधींना भेटण्यासाठी सभागृहाबाहेर चांगलाच गोंधळ घातला. त्यानंतर काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी राहुल गांधींबरोबर त्यांची भेट घडवून दिली.

शाळा, रुग्णालयाचे लोकार्पण
मंगळवारी राहुल गांधी खासदार निधीतून तिलोई विधानसभा मतदारसंघात तयार करण्यात आलेल्या 200 खाटांच्या रुग्णालयाचे लोकार्पण करणार आहेत. त्याचबरोबर ते एका शाळेचेही उद्घाटन करणार आहेत. दुपारी एक वाजता संग्रामपूरच्या कसारामध्ये हा कार्यक्रम होईल.

दुपारी सुमारे तीन वाजता राहुल गांधी अवकाळी पावसाने पिकांचे नुकसान झाल्यामुळे आत्महत्या करणाऱ्या शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांची भेट घेणार आहेत. राहुल गांधींनी नुकताच संसदेत शेतकऱ्याच्या मुद्द्यावर आक्रमकपणे भूमिका मांडली आहे.

पुढील स्लाइड्सवर पाहा, संबंधित PHOTO'S
बातम्या आणखी आहेत...