आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Congress Voice President Rahul Gandhi Attacks On PM Narendra Modi At Delhi

पंतप्रधान डरपोक, राहुल यांचा घणाघात; ललित मोदींना भारतात आणण्याचे आव्हान

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली- नवी दिल्ली- देशात स्वातंत्र्याचा गळा घोटला जात आहे. त्यासाठी देशाला राष्ट्रीय स्वयंसेवक संघ (आरएसएस) व नरेंद्र मोदी यांच्यापासून वाचवण्यासाठी आलो असल्याचे सांगत कॉंग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी भाजपवर घणाघाती आरोप केला.

संसदेचे पावसाळी अधिवेशन अनिश्चित काळासाठी तहकूब झाल्यानंतर राहुल गांधी यांनी पत्रकारांना संबोधित केले. यावेळी राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी व केंद्र सरकारवर हल्ला चढवला. सत्ताधारी भाजप पक्षाच्या मंत्र्यांवर आरोप होत असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी सभागृहात येत नाहीत, हे दुर्दैव असल्याचे राहुल गांधी यांनी म्हटले.

'आम्हाला निवडणुकीत पराभवाचा सामना करावा लागला होता. तेव्हा मला वाटत होते की, या माणसात काही तरी दम आहे. परंतु, तो गैरसमज होता. आता माझ्या लक्षात आले आहे. देशाचे पंतप्रधान डरपोक आहे. मोदींमध्ये दम नसल्याचे स्पष्ट झाले आहे. मोदींना चांगली संधी आहे. त्यांनी ललित मोदींना पकडून पुन्हा भारतात आणून क्रिकेटमधील सफाई करावी' असे आव्हान देखील राहुल गांधी यांनी दिले आहे.
पंतप्रधानांनी देशातील जनतेला वचन दिले होते. 'खाणार नाही आणि खाऊ देणार नाही', असा विश्वास दिला होता. परंतु, पंतप्रधान सभागृहात येत नाहीत, हे दुर्दैव असल्याचे राहुल गांधी यांनी म्हटले आहे.

दरम्यान, जीएसटी विधेयक पारित न करताच राज्यसभा आणि ललितगेट प्रकरणी विरोधकांनी केलेल्या गदारोळामुळे आज (गुरुवारी) लोकसभेचे कामकाज अनिश्चित काळासाठी तहकूब करण्‍यात आले आहे. दुसरकडे, सत्ताधारी भाजपच्या खासदारांचा विजय चौक ते संसद भवनदरम्यान मोर्चा काढला आहे. संसदेत कामकाज सुरळीत चालत नसल्याने भाजपच्या खासदारांनी निषेध मोर्चा काढला आहे. मोर्चात परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज, केंद्रीय मंत्री नितिन गडकरी, गृहमंत्री राजनाथ सिंह यांच्यासह दिग्गजांची हजेरी लावली आहे.

दरम्यान, 'ललितगेट' प्रकरणी संसदेचे पावसाळी अधिवेशन 'गोंधळाच्या पावसात' धुतले गेले आहे. कॉंग्रेसच्या खासदारांची संसदेत केलेल्या गदारोळामुळे कामकाज सुरळीत चालू शकले नाही. यासाठी कॉंग्रेसने सत्ताधारी भाजप पक्षालाच जबाबदार ठरवले आहे. कॉंग्रेसने संसद परिसरात निदर्शने सुरु केली आहेत. कॉग्रेसच्या आंदोलनाला तृणमूल काँग्रेसने पाठिंबा दिला असून तृणमृल कॉंग्रेसचे खासदार देखील आंदोलनात सहभागी झाले आहेत.

पुण्यातील बहुचर्चित फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट ऑफ इं​डियाचा (FTII) अध्यक्षपदी अभिनेते गजेंद्र चौहान यांची निवड झाल्याने सुरू झालेला वाद दिवसेंदिवस अधिकच टोक गाठत आहे. FTII मध्ये विद्यार्थ्यांची बाजू घेत राहूल गांधी राष्ट्रपती प्रणब मुखर्जी यांची भेट घेतली. केवळ संघ परीवाराशी संबंधित असल्यामुळे लोकांच्या उच्चपदावर नियुक्त्या होत असल्याचा आरोप राहूल गांधींनी यावेळी केला आहे. दरम्यान, राहुल गांधी यांनी काही दिवसांपूर्वी पुण्यातील FTII च्या विद्यार्थ्यांसोबत संवाद साधला होता. विद्यार्थ्यांना पाठिंबा दिला होता.